Russia Missile Attack:जगात तिसऱ्या युद्धाचे ढग कायम आहेत. या युद्धाचा भडका अद्याप उडत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहेत. रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. रशिया युक्रेनच्या शहरांवर बॉम्बफेक करत आहे. त्याचवेळी, डनिप्रो शहराचा एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही गाड्या रस्त्यावर दिसत आहेत आणि नंतर अचानक एक क्षेपणास्त्र येते आणि पडते. त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडतो. हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून हे शेअर करण्यात आले आहे. गुरुवारीच रशियाने कीव येथे कॅलिबर क्रूझ क्षेपणास्त्र डागले, जे युक्रेनच्या पृष्ठभागावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने रोखले.
हा व्हिडिओ कारच्या आतून शूट करण्यात आला आहे. रस्त्यावरुन एक कार जात असल्याचे दिसत आहे, नंतर अचानक एक क्षेपणास्त्र येऊन पडले आणि आगीचा भडका उडताना दिसतोय. त्यानंतर सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले. आगीपासून वाचण्यासाठी वाहने मिळेल त्या रस्त्यांनी पळविण्यात आलीत. (अधिक वाचा - Jupiter वर या कारणामुळे वाढतेय उष्णता, शास्त्रज्ञांनी केला हा मोठा खुलासा)
The city of Dnipro. Ukraine. Today. XXI century.
Terrorists are still not being punished.
We will carry out justice.
We will protect the international order.— Defense of Ukraine DefenceU November 17, 2022
व्हिडिओ शेअर करताना युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलेय, युक्रेनचे डनिप्रो शहर. आज 21 वे शतक आहे. दहशतवाद्यांना शिक्षा होत नाही. आम्ही न्याय देऊ. आम्ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे रक्षण करु. युक्रेनचे प्रथम परराष्ट्र व्यवहार मंत्री एमीन झेपर यांनीही व्हिडिओ शेअर केला असून, डनिप्रोमध्ये रशियन हल्ल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीसह 14 जण जखमी झाले आहेत. त्यांनी लिहिले, 'हल्ल्यानंतर रशियन क्षेपणास्त्राचा तुकडा महिलेच्या शरीरात घुसलाय. त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
following attack this morning. Doctors make everything possible to save her life.
In total, in Dnipro 14 people were injured, including 15 years old girl.— Emine Dzheppar EmineDzheppar November 17, 2022
गुरुवारी रशियाने पुन्हा एकदा जोरदार हल्ले केले. रशियाच्या सततच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील ऊर्जा पायाभूत सुविधा कोलमडल्या आहेत. तेथे थंडीचा प्रकोप वाढू लागला असून पारा घसरत आहे. गुरुवारी कीववर दोन क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. परंतु किती लोक मरण पावले हे सध्या स्पष्ट झालेले नाही.