Mother Teresa 112th birth anniversary : प्रिंसेस डाएना यांच्या अपघाती निधनानं मदर तेरेसा हळहळतात तेव्हा...

आयुष्यभर दुसऱ्याची सेवा आणि सहाय्य करत स्वतःला समर्पित करणाऱ्या, अत्यंत उदार, दयाळु आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्या मदर तेरेसा यांच्या जीवनातील काही किस्से ....

Updated: Aug 26, 2022, 12:57 PM IST
Mother Teresa 112th birth anniversary : प्रिंसेस डाएना यांच्या अपघाती निधनानं मदर तेरेसा हळहळतात तेव्हा... title=

Mother Teresa 112th birth anniversary : आयुष्यभर दुसऱ्याची सेवा आणि सहाय्य करत स्वतःला समर्पित करणाऱ्या, अत्यंत उदार, दयाळु आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्या, सर्वात महान मानवतावादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मदर तेरेसा या लाखो लोकांसाठी आई बनल्या होत्या. निस्वार्थ भावाने मदर तेरेसा गरिब, आजारी, लाचार, असाहय्य आणि गरजवंतांची मदत करत असत. त्या स्वतःकरता नाही तर इतरांसाठी आयुष्य जगल्या. आज आम्ही तुम्हाला मदर तेरेसा यांच्या जीवनातील काही किस्से सांगणार आहोत....

प्रिंसेस डायना आणि मदर तेरेसा यांच्या मैत्रीबद्दल...

प्रिंसेस डायनावर मदर तेरेसा यांचा प्रचंड प्रभाव होता. डायनाचे माजी बटलर पॉल बुरेलांनी असं सांगितलं की, जेव्हा डायना मदर तेरेसा यांना भेटल्या तेव्हा त्यांना मदर तेरेसांकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांना "आध्यात्मिक साक्षात्कार" झाला.

“डायना यांना गरीब लोकांबद्दल अत्यंत सहानुभूती होती. त्यासोबतच, त्या खूप उत्साही आणि घरगुती देखील होत्या. सर्व बहिणी आणि मी तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी प्रार्थना करत आहोत.”, डायनाच्या दुःखद मृत्यूनंतर, मदर तेरेसा यांनी प्रिंसेस डायनाच्या सन्मानार्थ असं वक्तव्य केलं होतं.

जरी त्यांची फक्त दोनदा भेट झाली असली तरी, प्रिन्सेस डायना आणि मदर तेरेसा या दोघी्ंचा एकमेकींवर खुप प्रभाव होता. त्या दोघीही गरजवंतांना मदत करण्यासाठी आयुष्यभर झटत होत्या.

मदर तेसेसा यांचे काही किस्से...

- मदर तेरेसा यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा विशेषत: अहिंसेच्या तत्वांचा खुप प्रभाव होता.

-लहानपणीचा बराच वेळ मदर तेरेसा चर्चमध्ये घालवत असत. तेव्हापासूनच त्या मिशनरीजच्या जीवनाकडे वळल्या.

- वयाच्या 18 वर्षीच तेरेसा यांनी घर सोडलं होतं आणि त्यानंतर त्यांनी कधीच कुटूंबीयांनची भेट नाही घेतली.

- मदर तेरेसा यांना अल्बानियाई, सर्बियाई, इंग्रजी, हिंदी आणि बंगाली भाषा बोलता येत होत्या. वेगवेगळ्या भाषा शिकल्यामुळे लोकांच दु:ख समजून घ्यायला आणि त्यांच्याशी संवाध साधायला सोप्प जातं म्हणून त्यांनी अनेक भाषां शिकल्या होत्या.

- मदर तेरेसा गर्भनिरोध आणि गर्भपाताच्या विरोधात होत्या. गर्भपात करणं हे मानवाची हत्या करण्यासारखंच आहे, मानवजातीसाठी ही अत्यंत निंदणीय बाब आहे.  

- 1993 ते 1948 पर्यंत मदर तेरेसा यांनी कोलकत्ताच्या सेंट मॅरी हायस्कूलमध्ये भूगोल, अंकगणित आणि धर्माचं शिक्षण दिलं. त्यानंतर तिथेच मुख्यध्यापिकाचा पदभार सांभाळत सेवा दिली.

- 2015 ला रोमन कॅथोलिक चर्चच्या पोप फ्रांसिस यांनी मदर तेरेसा यांना संत घोषित केलं.