Nepal Plane Crash Video : काठमांडूहून 72 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान रविवारी सकाळी नेपाळमधील (Nepal) पोखराजवळ (Pokhara) दुर्घटनाग्रस्त झालं. या विमान अपघातात (Plane Crash) 68 प्रवाशांचा बळी गेला आहे. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या विमानातील एका प्रवासाने विमान प्रवासदरम्यान फेसबुक लाईव्ह करत होता. त्यावेळी हा अपघात झाला आणि तो कॅमेऱ्यात कैद झाली.
Final moment of fatal plane crash caught on camera by passenger
Rest In Peace#RIP #Pokhara #Nepal #PlaneCrash #PokharaPlaneCrash #Indian #India #NepalPlaneCrash pic.twitter.com/BdULoQnwgz
— Dipesh Jung Sapkota(@dipeshs41927926) January 15, 2023
या दुर्घटनेत 5 भारतीय मित्रांचा समावेश आहे. विशाल शर्मा, सोनू जैस्वाल, संजय जैस्वाल, अभिषेत कुशवाह आणि अनिल राजभर असं या मृत तरुणांची नाव आहेत. हे प्रवासी उत्तरप्रदेशातील गाझीपूर आणि वाराणसीमधील रहिवासी होते. ही मित्रमंडळी 13 जानेवारीला नेपाळ फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्यापैकी एकाने अपघातापूर्वी विमानाच्या आतून फेसबुक लाईव्ह केलं. या व्हिडीओमध्ये त्या तरुणाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन सुन्न होतं.
या विमान अपघातानंतर अनेक व्हिडीओ समोर आले यातील हा व्हिडीओ निशब्द करणारा आहे. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच हे विमान कोसळले. धावपट्टीपासून काही मीटर अंतरावर असताना अचानक विमान डाव्या बाजूकडे झुकले.
Pokhara Nepal Plane Crash -#नेपाल के #पोखरा में प्लेन क्रैश
कुल 72 लोग सवार थे 16 से ज़्यादा शव बरामद
---#Nepal #planecrash pic.twitter.com/aFBfGBJlv4— Chandan kumar singh (@Chandan48430579) January 15, 2023
मिळालेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे विमान आदळल्याचं सांगितलं जातं आहे. या विमानात 15 परदेशी नागरिक आणि सहा मुलांशिवाय 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 2 कोरियन, 1 अर्जेंटिनियन आणि आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समधील प्रत्येकी एक प्रवासी विमानात होते, असं एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटलंय.
#Nepal
72 passengers were on board. Plane crash at Pokhra International Airport. pic.twitter.com/igBoObcCDm— Aishwarya Paliwal (@AishPaliwal) January 15, 2023
मे 2022 मध्ये नेपाळी वाहक तारा एअरने चालवलेल्या विमानातील सर्व 22 लोक, ज्यात 16 नेपाळी, चार भारतीय आणि दोन जर्मन असे प्रवासी असणारे विमान क्रॅश झाले होते. यात सर्व प्रवासी मरण पावले होते.
मार्च 2018 मध्ये काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ यूएस-बांगला एअरलाइन्सचं विमान क्रॅश-लँड झालं होतं. या दुर्घटनेत 51 जणांचा बळी गेला होता.
1992 मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान काठमांडूकडे जाताना क्रॅश झालं तेव्हा त्यातील सर्व 167 लोक मरण पावले होते. ही सर्वात हादरवून टाकणारी घटना होती.
दोन महिन्यांपूर्वी याच विमानतळाजवळ थाई एअरवेजचं विमान कोसळून 113 जणांचा मृत्यू झाला होता.