चिमुकल्याला खेळणं देण्याची हौस पडली महागात, लाखोंचा भुर्दंड

लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यामुळे त्यांना ओरडू नये असं म्हणतात. पण कधीकधी हीच लहान मुलं आई-वडिलांना नकळत मोठ्या संकटात टाकतात. अशावेळी आई वडीलही हतबल होतात. त्यामुळे त्यांना खूप मोठा फटका बसतो. 

Updated: May 25, 2022, 11:56 AM IST
चिमुकल्याला खेळणं देण्याची हौस पडली महागात, लाखोंचा भुर्दंड title=

हाँगकाँग : लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यामुळे त्यांना ओरडू नये असं म्हणतात. पण कधीकधी हीच लहान मुलं आई-वडिलांना नकळत मोठ्या संकटात टाकतात. अशावेळी आई वडीलही हतबल होतात. त्यामुळे त्यांना खूप मोठा फटका बसतो. 

खेळण्याचं दुकान पाहिलं की लहान मुलं खूप हट्ट करतात असं एका दाम्पत्याच्या बाबतीत घडलं. चिमुकल्याने हट्ट केला म्हणून खेळणं घ्यायला निघाले पण हातात 5 लाखांचं बिल आलं. 

नेमका काय प्रकार?
मुलाला खेळणं घेऊन देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला 5 लाखांचा भुर्दंड बसला. दुकाना खेळणं खरेदी करताना चिमुकल्याने एका मूर्तीला धक्का मारला. त्यामुळे ती मूर्ती खाली पडली आणि फुटली. 

या फुटलेल्या मूर्तीचं बिल या मुलाच्या पालकांच्या हातावर ठेवण्यात आलं. या मूर्तीची किंमत 4 लाख 80 हजार रुपये होती. चिमुकल्याला एक छोटं खेळणं घेऊन देण्याच्या नादात 5 लाख रुपयांचं एवढं मोठं नुकसान दाम्पत्याला सोसावं लागलं. 

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मूर्ती तुटून मोठं नुकसान झाल्याने दुकानदाराने चिमुकल्याच्या पालकांना त्याचा दंड लावला. या प्रकरणी सोशल मीडियावर अनेक लोक चिमुकल्याला सपोर्ट करण्यासाठी पुढे आले आहेत. ही घटना हाँगकाँगमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे.