मुंबई : दररोज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन्सची चित्रे आणत असतो. यामध्ये अनेक वेळा तुम्ही लपवलेल्या गोष्टी सहज शोधता, तर कधी कधी डोळ्यांवर जास्त जोर द्यावा लागतो. आजही आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लपलेला प्राणी शोधायचा आहे.
वरील चित्रात पाहिल्यास घनदाट जंगल दिसेल. झाडांनी वेढलेल्या या जंगलात एक प्राणी लपला आहे. हा प्राणी या चित्रात कुठे लपलाय हे तुम्हाला शोधायचंय. त्यामुळे डोळे आणि डोक चालवा आणि ३० सेकंदात जंगलात लपलेला
हा प्राणी शोधून दाखवा.
येथे लपलाय 'हा' प्राणी
३० सेकंदांनंतरही तुम्हाला प्राणी शोधण्यात अपयश आले असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो हा प्राणी कुठे लपलाय तो. या चित्रात एक कोल्हा अगदी आरामात झोपलेला आहे. घनदाट जंगलात कोल्ह्याचा शोध घेण्यात अनेकांना अपयश आले आहे.
घनदाट झाडांनी वेढलेल्या या जंगलात तुम्ही कोल्ह्याला जमिनीवर शोधण्याचा प्रयत्न केला असेलच. पण तुम्हाला माहीत आहे का की कोल्हा जमिनीवर लपलेला नाही. जर तुम्ही चित्राच्या उजव्या बाजूला असलेली झाडे पाहिली तर तुम्हाला चित्राच्या कोपऱ्यात असलेल्या झाडांच्या वरच्या भागात झोपलेला कोल्हा दिसेल.