पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला

Pakistan Air Base Terrorist Attack: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी करण्यात आला आहे. 

Updated: Nov 4, 2023, 10:59 AM IST
पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला  title=

Pakistan Attack: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी करण्यात आला आहे. आत्मघातकी हल्लेखोरांनी पंजाबच्या मियावलीतील हवाई तळावर घुसखोरी केली केल्याचे वृत्त समोर आले आहे. दोन्ही बाजुने जबरदस्त फायरिंग सुरु झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत सुरक्षा दलांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. ग्वादरमध्ये सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 14 जवान शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या मीडियाने दिली. सुरक्षा काफिला ग्वादर जिल्ह्यातील पासनी येथून ओरमाराच्या दिशेने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. 'या घृणास्पद कृत्याचे गुन्हेगार शोधून काढले जातील [आणि] त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने म्हटले आहे.

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दल लक्ष्य गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी पाकिस्तानमधील सुरक्षा दलांना सातत्याने लक्ष्य करत असल्याचे दिसून आले आहे. 2023 च्या पहिल्या नऊ महिन्यांत किमान 386 सुरक्षा दलांनी प्राण गमावले. ही आठ वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत, 190 हून अधिक दहशतवादी हल्ले आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सुमारे 445 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 440 जण जखमी झाले.

खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान हे हिंसाचाराचे प्राथमिक केंद्र राहिले. गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ले वाढले तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारसोबतचा युद्धविराम संपुष्टात आणल्यानंतर अलीकडच्या काही महिन्यांत, विशेषत: खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानने दहशतवादी कारवायांमध्ये वाढ केली आहे.