इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवाने काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताला धमकी दिलीय. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धाला ५३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बाजवा यांनी भारताला धमकी दिलीय. काश्मीरातल्या दहशतवादालाही बाजवांनी समर्थन दिलंय.
भारत पाकिस्तान सीमेवर सांडलेल्या रक्ताचा बदला घेतला जाईल असं बाजवा यांनी म्हटलंय. काश्मीरातली लढाई ही स्वातंत्र्याची लढाई असल्याची मुक्ताफळं बाजवा यांनी उधळली. या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही काश्मीरचा उल्लेख केला.
गेल्याच महिन्यात काँग्रेस नेता नवज्योत सिद्धू यांनी पाकिस्तान दौरा केला. त्यात पाकिस्तानी लष्करप्रमुखांची सिद्धूने गळा भेटही घेतली. त्या गळाभेटीनंतर आता पाकिस्तानने आपले खरे रंग आता दाखवून दिलेत.