नवी दिल्ली : भारतीय गुप्तचर यंत्रणने मोठा खुलासा केला आहे. जगातील विविध देशांमध्ये राहणाऱ्या खलिस्तानी समर्थकांच्या माध्यमातून पाकिस्तान पंजाबला भारतापासून वेगळे करण्याचा कट रचत असल्याचं पुढे आले आहे. सोशल मीडियावर खलिस्तानशी संबंधित हॅशटॅग ट्रेंड करण्यासाठी खलिस्तानी गट अशा घोस्ट ट्विटर अकाउंटची मदत घेतात. इतकेच नाही तर गेल्या महिन्यात 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान खलिस्तान जनमताच्या समर्थनार्थ 29032 ट्विट करण्यात आले होते, ज्यांना जगभरात 7826 लोकांनी रिट्विट केले होते.
या महिन्यात खलिस्तानच्या समर्थनार्थ 334 नवीन ट्विटर अकाउंट्सही तयार करण्यात आली आहेत. सुरक्षा एजन्सीशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची आयएसआय सतत खलिस्तानी दहशतवादी आणि खलिस्तानी समर्थकांच्या संपर्कात असते.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पाकिस्तानातील लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. पाकिस्तान जगभरातील आपले दूतावास आणि उच्चायुक्तांच्या माध्यमातून खलिस्तानी समर्थकांना आणि दहशतवाद्यांना मदत करत आहे. त्यांनी पैसा आणि शस्त्रे पुरवत आहेत. जेणेकरून भारतात अशांतता पसरवता येईल.
झी मीडियाकडे उपलब्ध माहितीनुसार, शीख फॉर जस्टिस (एसएफजे) ने शेकडो बनावट ट्विटर हँडल तयार केले आहेत, ज्याद्वारे कट रचला जातोय. सोशल मीडियावर खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या 1450 घोस्ट ट्विटर अकाऊंटची माहिती समोर आली आहे, ज्यांचे फॉलोअर्स शून्य आहेत.
ज्या ट्विटर अकाऊंटवरून खलिस्तानच्या समर्थनार्थ ट्विट करण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश ट्विटर अकाऊंटवर हिजाब बॅन, पाकिस्तान आर्मी, काश्मीरशी संबंधित हॅशटॅगही ट्विट करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तानचे समर्थन करणारी बहुतांश ट्विटर अकाऊंट्स पाकिस्तानमधून चालवली जात आहेत आणि अनेक खलिस्तानी ट्विटर अकाउंट्स पाकिस्तानमधून ट्रेंड केली जात आहेत. पाकिस्तानची आयएसआय कॅनडा, जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये बसून खलिस्तानींना उघड पाठिंबा देत आहे. पाकिस्तानी लष्करातील अनेक निवृत्त अधिकारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून खलिस्तान सार्वमताच्या समर्थनार्थ सतत पोस्ट करत आहेत.
फेसबुक, यूट्यूब तसेच मोबाईल अॅप्सची मदत घेत आहेत. भारत सरकारने "2020 शीख सार्वमत" शी संबंधित मोबाइल अॅपवर देशात बंदी घातली आहे, परंतु हे मोबाइल अॅप जगातील अनेक देशांमध्ये सक्रिय आहे, ज्याद्वारे खलिस्तानचा अजेंडा चालवला जात आहे. पंजाब आणि काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा मोठा कट पाकिस्तानने रचला आहे. गुप्तचर संस्थांच्या मते, पाकिस्तानच्या आयएसआयने काश्मीर आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना एकत्र करून भारतात त्यांच्या दहशतवादी कारवाया तीव्र करण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानच्या आयएसपीआरने अशा प्रकारे ट्विट केले आहे की, हा अर्शदीप सिंगविरोधात सर्वसामान्य भारतीयांचा राग असल्याचे दिसून येत आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, भारताविरुद्ध खलिस्तानी कट रचण्यासाठी पाकिस्तानने खलिस्तानी गटाचा वापर केला जेणेकरून पंजाबमध्ये राहणाऱ्या शीखांना भारताविरोधात भडकावता येईल आणि देशात दंगली घडवता येतील. मिळालेल्या माहितीनुसार, अर्शदीप सिंगच्या विरोधात खलिस्तानी ट्विटबाबत परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानींच्या मदतीने हा कट रचण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शदीप सिंग चुकून पाकिस्तानी क्रिकेटरचा झेल चुकवल्यानंतर लगेचच ISI ने आपल्या सोशल मीडिया आर्मीच्या मदतीने खलिस्तानशी संबंधित अनेक हॅशटॅग तयार केले आणि पाकिस्तानींच्या मदतीने त्यावर पोस्ट केले, जेणेकरून काही वेळातच हे सर्व ट्विट ट्रेंडिंग होऊ लागले.