कराची : विनाकारण भारताच्या कुरापत्या काढणाऱ्या पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. या कर्जाच्या ओझ्याखाली पाकिस्तान पुरता दबला गेला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना खूप मोठा काळ वाट पाहावी लागणार आहे. याआधीच्या पाक सरकारने इतके कर्ज घेऊन ठेवलंय की सध्या त्याहून जास्त व्याजंच द्यावे लागत असल्याचे खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने मान्य केले आहे. पाकिस्तानला कर्जाचे रोज 6 बिलियन रुपये म्हणजे 11 अब्ज रुपये व्याज म्हणून द्यावे लागत असल्याचे इम्रान यांनी सांगितले. मंगळवारी एका सरकारी कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. रेल्वे लाईव्ह ट्रॅकिंग सर्व्हिस आणि थल एक्स्प्रेस रेल्वे सेवेचे त्यांनी उद्घाटन केले. मागच्या सरकारमुळे आम्ही रोज 11 अब्जांचे व्याज चुकते करत असल्याचे ते म्हणाले.
विशेष कारण नसतानाचा खर्च कमी करण्याचे आवाहन आम्ही सर्व मंत्र्याना केल्याचे इम्रान यांनी सांगितले. मागच्या सरकारांनी दिलेल्या एनआरओमुळे सरकारी तिजोरीला मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले.
भ्रष्टाचार संदर्भातील प्रकरणे राष्ट्रीय ब्यूरोला पाठवण्याचे निर्देश इम्रान यांनी रेल्वे मंत्री शेख रशीद यांना दिले. 157 कोटी रुपये गॅस सेक्टरवर खर्च करण्यात येत आहेत. प्रत्येक वर्षी 50 कोटी रुपयाच्या गॅस भंडारचा दुरूपयोग केला जातो. आमचे सरकार सत्तेत आले आहे. चीन सोबत सीपीईसी च्या अनेक प्रकल्पांवर काम करत असल्याचे इम्रान यांनी सांगितले.
मागच्या सरकारने रेल्वे विभागातील कमतरता दाखवल्या. एक अब्ज रुपयांच्या मशिन खरेदी केल्या ज्या कामाच्या नाहीत. साधारण 400 ते 500 दशलक्ष रुपये ओकारा आणि नारोवाल स्थानकांवर विनाकारण खर्च केले आहेत असे यावेळी पाकचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी म्हटले.