लंडन : आपल्याकडे प्लंबर म्हणजे हलक्या दर्जाचे काम करणार व्यक्ती, अशी सर्वासाधारण समजूत. पण, कोणतेही काम वाईट किंवा हलक्या प्रतिचे नसते. त्यात प्लंबरचे तर नाहीच नाही. तुम्हालाही हे हमखास पटेल. पण, त्यासाठी सुरूवातील तुम्हाला त्यासाठी या प्लंबरची वर्षाची कमाई समजून घ्यावी लागेल.
नाव- स्टीफन फ्राई, वय फक्त ३४ वर्षे, वार्षिक कमाई - सुमारे २ कोटी रूपये आणि ठिकाण- लंडन. काही वेळा कामामुळे व्यक्तीला प्रतिष्टा प्राप्त होते. तर, कधी व्यक्तीमुळे कामाला. लंडनमधील स्टीफन फ्राई याच्याबाबत असेच घडले. या व्यक्तीने कामाला इतके वाहून घेतले की, आज त्याच्याकडे एक यशस्वी व्यक्तीच नव्हे तर, यशस्वी उद्योजक म्हणून पाहिले जाते. अगदी एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे हा व्यक्ती आपले आयुष्य जगतो. त्यासाठी मालदीवसारख्या नितांतसुंदर समुद्र किनाऱ्यावरही तो आपली सुट्टी व्यतित करतो. तो कॅनरी आयलॅंडमध्ये फिरतो आणि लंडनच्या उच्चभ्रू परिसरात राहतो.
स्टीफन फ्राईचे वेशिष्ट्य असे की, तो जेव्हा काम करतो तेव्हा कामाशी एकरूप होतो. तो काम करायला लागला की अनेक तास तो कामच करत राहतो. कधी कधी तर तो चक्क ५८ तासही काम करतो. विशेष म्हणजे साप्ताहिक सुट्टी दिवशी तो कामाला हातही लावत नाही. स्टीफन फ्रायने वयाच्या १७ व्या वर्षी प्लंबिंगचे काम करण्यास सुरूवात केली. आता जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा, आश्चर्यचकीत होत असल्याचे सांगतो.
स्टीफनच्या कौटुंबिक पार्श्वभुमीबद्दल बोलायचे तर, त्याचे वडील पेशाने बिल्डर आहेत. पण, त्याला त्याच्या वडिलांच्या व्यवसायापेक्षा प्लंबींगच्या कामात ऋची होती. आपल्या सातत्याने अधीक तास काम करण्याबाबत तो सांगतो, आपण थकलेले वाटू शकतो पण, माझ्या सवयीमुळी मी पिमिलिकोमधला सर्वाधिक कमावणारा प्लबंबर आहे. पण, मी अनेकदा थकलेलाही असतो. कामाच्या ताणामुळे अनेकदा स्टीफन कामाच्या ठिकाणीच डुलकीही काढतो.
इंग्लंडमधील वृत्तपत्र डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, स्टीफन जेव्हा १७ वर्षांचा होता तेव्हा, तो नोकरी शोधत होता. नोकरी शोधण्यास किंवा शोधून देण्यास मदत करणाऱ्या एका स्थानिक संस्थेमुळे त्याला प्लंबिंगच्या कामाबाबत माहिती मिळाली. त्याने एका कंपनीच चार वर्षे प्रशिक्षण घेतले. त्याला ट्रेनिंगनंदर १०० पाऊंड प्रतिहप्ता उत्पन्न मिळू शकले. या क्षेत्रात उतरून आज त्याल २० वर्षे झाली. आहेत. आज त्याची स्वत:ची कंपनी आहे. त्याच्या कंपनीने त्याला चांगलाच हात दिला आहे. त्यामुळे वर्षाकाठी २ कोटी कमावणार प्लंबर अशी ख्याती त्याने मिळवली आहे.