नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. पुलवामा हल्ल्याचा जास्त लाभ कोणाला झाला असेल तो केंद्र सरकारला, अशी टीका काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली. त्याचवेळी आज पुलवामा हल्ल्याची वर्षपूर्ती असताना पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्ताने केलेल्या गोळीबारानंतर सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. हा हल्ल्यात एक नागरिक ठार चार जण जखमी झाले आहेत.
गतवर्षी पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला गेला. यात भारतीय सैन्याचे मोठे नुकसान झाले. सीआरपीएफच्या जवानांची बस दहशतवाद्यांनी उडवून दिली होती. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. या जवानांना भारतात आदरांजली वाहण्यात येत असताना पाकिस्तानने पुन्हा एका पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे. त्यामुळे तणावात भर पडली आहे.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पण पाकिस्तानच्या गोळीबारात एक नागरिकाचा मृ्त्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.
तर दुसरीकडे तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यब पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानसाठी काश्मीर जेवढे महत्त्वाचे आहे तेवढचे तुर्कीसाठीही आहे, असे वादग्रस्त वक्तव्य तय्यब एर्दोगान यांनी केले. यापार्श्वभूमीवर पाकिस्तान सैन्याने हा गोळीबार केल्याने तणाव वाढण्यास मदत झाली आहे.