Sputnik Vचे 2 डोस घ्या आणि रशियामध्ये फिरण्याचा घ्या आनंद, Vaccine Tourismची अनोखी ऑफर

पर्यटकांची या टूरिझमला पसंती 

Updated: May 20, 2021, 11:29 AM IST
Sputnik Vचे 2 डोस घ्या आणि रशियामध्ये फिरण्याचा घ्या आनंद, Vaccine Tourismची अनोखी ऑफर title=

मुंबई : कोरोनाचा महामारीचा मोठा फटका हा टूरिझम इंडस्ट्रीवर पडला आहे. अनेक देशांनी आपली बॉर्डर बंद ठेवली आहे. त्यामुळे आता देशाबाहेर फिरणं एका स्वप्नासारख वाटू लागलं आहे. कोरोनावर मात मिळवण्यासाठी संपूर्ण जग कोरोना प्रतिबंधात्मक व्हॅक्सिचं आयोजन करत आहे. अशा परिस्थितीत ट्रॅव्हल एजन्सीने व्हॅक्सीन आणि टुरिझम या दोन गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी खास ऑफर देखील दिली आहे. पर्यटक देखील या व्हॅक्सीन टूरिझमला पसंत करत आहेत. 

दुबईची ट्रॅव्हल एजन्सीने दिल्ली ते मॉस्कोकरता 24 दिवसांच पॅकेज टूर शुरूवात केली आहे. या पॅकेजच्या अंतर्गत पर्यटकांना रूस बोलवलं जाईल. Sputnik V व्हॅक्सीनचे दोन डोस ऑफर केले जाणार आणि सोबतच सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे. 

या पॅकेजची खास गोष्ट अशी आहे की, पर्यटक या दोन डोसच्या मध्ये रूसमधील वेगवेगळ्या जागांना भेटी देखील देऊ शखतात. या पॅकेजची किंमत आहे 1.29 लाख रुपये. यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीसोबत इतर खर्च देखील सहभागी आहेत. 

इंडिया टुडेने एका ट्रॅव्हेल एजन्सीसोबत याबाबत चर्चा केली. एजन्सीनुसार, लोकांमध्ये या पॅकेजबाबत खास उत्साह आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 28 टूरिस्टची पहिली बॅच 29 मे ला रवाना होणार आहे. आता ही बुकिंग पूर्ण झाली आहे. टूरिस्टचा शेवटचा ग्रुप 7 आणि 15 जूनला रूस करता निघणार आहे. 

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, जर व्हॅक्सीन नाही लावली तर तु्म्हाला Sputnik V च्या डोसकरता रूसमध्ये घेतले जाणे. 24 रात्री आणि 25 दिवस पॅकेजकरता व्हॅक्सीनकरता दोन डोस, दिल्ली मॉस्कोची हवाई किट, सेंट पीटर्सबर्गच्या 3 स्टार हॉटेलमध्ये 4 दिवस राहण्याची व्यवस्था आहे. मॉस्कोच्या 3 स्टार हॉटेलमध्ये 20 दिवस राहण्याची सुविधा आहे. 

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार,'प्रत्येक स्लॉटमध्ये 30 पर्यटकांना नेण्यात येत आहे. पॅकेजमध्ये फक्त 10 हजार वीजा शुल्कचा सहभाग होता. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग सारख्या ठिकाणी फिरण्याचा खर्च देखील यामध्ये आहे.'