नवी दिल्ली : रशिया विरुद्ध युक्रेन युद्धसंघर्ष पेटला आहे. आता रशियानं अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. या युद्धामध्ये रशियाचं समर्थन करण्यासाठी पाकिस्तान पुढे सरसावला आहे. पाकिस्तान रशियाला समर्थन करणारा पहिला देश ठरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्लादिमीर पुतीन यांचं समर्थन केलं आहे.
इम्रान खान यांनी पुतीन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्या. त्याच वेळी रशियाकडून 20 लाख टन गहू आणि नॅचरल गॅस पाकिस्तान आयात करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धसंघर्ष सुरू झाला. आता पाकिस्ताननं रशियाचं समर्थन केलं आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खिळखिळी होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची गोची झाली आहे. त्यामुळे आता इम्रान खान यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन समर्थन केलं. या भेटीदरम्यान त्यांनी काही करारांवर स्वाक्षऱ्याही केल्याची माहिती मिळाली आहे.
रशियाकडून 20 लाख टन गहू पाकिस्तान आयात करणार आहे. नॅचरल गॅसचीही पाकिस्तानला गरज आहे. त्यामुळे या दोन्ही करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे व्यापर, आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसणार आहे.