Russia Ukrain War: सांताक्लॉजच्या वेशात अवकाशातून हल्लाबोल! Video सोशल मीडियावर व्हायरल

Ukraine Santa fires missiles: रशियाने युक्रेनवर 20 फेब्रुवारी 2022 रोजी हल्ला चढवला. त्यानंतर आज दहा महिने उलटून देखील युद्ध संपलेलं नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहेत. युक्रेनचं सैन्य रशियाच्या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे.

Updated: Jan 3, 2023, 05:32 PM IST
Russia Ukrain War: सांताक्लॉजच्या वेशात अवकाशातून हल्लाबोल! Video सोशल मीडियावर व्हायरल title=

Russia Ukrain War Viral Video : रशियाने युक्रेनवर 20 फेब्रुवारी 2022 रोजी हल्ला चढवला. त्यानंतर आज दहा महिने उलटून देखील युद्ध संपलेलं नाही. रशियाने युक्रेनवर (Russia vs Ukrain) आपले हल्ले सुरुच ठेवले आहेत. युक्रेनचं सैन्य रशियाच्या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे. युक्रेनियन सैन्यानं रशियाला आसमान दाखवलं आहे. रशियाला प्रत्युत्तर देण्यास युक्रेनियन सैन्य कुठेच कमी पडत नाहीत ख्रिसमसच्या दिवशी संपूर्ण जग सण साजरा करत असताना रशियाने आपली युद्धनिती सुरु होती. युक्रेनवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेननं कंबर कसली. या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सांताक्लॉजच्या वेशभूषेत असलेला युक्रेनचा सैनिक रशियावर मिसाईलचा मारा करताना दिसत आहे. 

युक्रेन लष्कराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "युक्रेनियन एअर फोर्स मिग-29 ने हल्ला केला. फायटर पायलटने अमेरिकन बनावटीच्या AGM 88 या क्षेपणास्त्राने रशियावर हल्ला चढवला. मिग विमानात दोन AGM 88 क्षेपणास्त्र मिग विमानात आहेत. तर दोन आखुड पल्ल्याची R-73 क्षेपणास्त्र आहेत." यावेळी फायटर विमानातील पायलट सांताक्लॉजच्या वेशभूषेत दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बातमी वाचा- चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video 

या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "सांताक्लॉजच्या वेशात असं कृत्य करणं बरं नाही. यामुळे चुकीचा संदेश जाईल." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'सांताक्लॉजने तरी हे युद्ध लवकर संपवावे. यामुळे दोन्ही देशातील जनतेचे हाल झाले आहेत. ' रशिया आणि युक्रेन युद्धात दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे.