Viral News : काही कुटुंब असे असतात ज्यामधील काही सदस्यांचे रहस्य ते त्यांच्यापूर्ती मर्यादीत असतात. त्यांचे हे रहस्य समोर आल्यास अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते. पण वर्षांवर्षे हे सत्य किंवा रहस्य त्यांच्याजवळच असतं. पण असंच एका मुलीच्या आईने तिच्यासोबत 36 वर्षे एक सत्य लपवलं होतं. ज्यावेळी हे सत्य त्या मुलीसमोर आलं. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ज्या व्यक्तीला आपलं व्यक्तीला आपला जन्मदाता वडील मानत होती. त्या व्यक्तीशी तिचं काहीच नातं नव्हतं.
ही कहाणी आहे इंग्लंडमधील टिफनी गार्डनरची. तिला लहानपणापासून माहिती होतं की, तिच्या खऱ्या वडिलांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि सावत्र वडिलांनी तिला लहानचं मोठं केलं. पण टिफनी नेहमी तिच्या जन्मदाताबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे. कॅन्सरने गेलेल्या वडिलांमध्ये आणि तिच्यामध्ये काय साम्य आहे, कुठले गुण त्यांच्यामध्ये जुळतात हे जाणून घेण्यासाठी ती कायम उत्सुकत असायची. (trending news 36 years the mother hid the truth of girl birth dad died viral news today google )
ज्या वडिलांबद्दल विचार करत ती लहानची मोठी झाली. त्यांच्याबद्दल एक धक्कादायक सत्य तिच्या समोर आलं. 2018 ची गोष्ट आहे, जेव्हा टिफनीला कळलं की, एका अज्ञात व्यक्तीच्या डोनेट केलेल्या स्पर्मपासून तिच्या जन्म झाला आहे. हे स्पर्म डोनर म्हणजे तिचे वडील जिवंत आहे. आपल्या आईने आपल्यापासून हे सत्य का लपवले? ही हे सगळं जाणून निशब्द झाली होती. आपल्या जन्मदाता जिंवत आहे. तर ज्या व्यक्तीला आपण आपले वडील मानत होतो ते आपले वडील नव्हते.
टिफनीने आपल्या आयुष्यात हे सत्य जेव्हा द मिररला सांगितलं तेव्हा तिच्या वेदना असह्य झाल्या होत्या. तिच्या आईने तिच्यापासून हे का लपवलं असं तिला विचारल्यावर ती म्हणाली की, तिच्या आईचे पहिले पती म्हणजे ती ज्यांना वडील मानत होत होती, त्यांनी मरताना वचन घेतलं होतं. मी जैविकदृष्ट्या त्यांची मुलगी नाही हे तिला कळता कामा नाही.
1982 मध्ये डॉक्टरांनी स्पर्म डोनेशनबद्दल कोणालाही काहीही न सांगायचं नाही असं सांगितलं होतं. माझ्या 36 व्या वाढदिवसाच्या आधी तिला हे सत्य समजलं. तिने पुढे असं सांगितलं की, एक दिवस ती आईसोबत किचनमध्ये काम करत होती. तेव्हा तिने मला ही गोष्ट सांगितली. त्यावेळी मला हे ऐकून धक्काच बसला. त्या क्षणानंतर माझं आयुष्य बदलून गेलं. क्षणात माझ्या असण्याचं सत्य समोर आल्यानंतर अनेक प्रश्न माझ्या समोर उभे राहिले होते. तिच्या आईला वाटलं टिफिनीसाठी हे सत्य लपवण्यातच सगळ्यांचं भल्ल आहे.