लंडन : कोरनाच्या संकटामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. धक्कादायकबाब म्हणजे ब्रिटनमध्ये तर राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. त्यामुळे आता ब्रिटनवासीयांना पुन्हा एकदा मोठा हादरा बसला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त हाती येताच ब्रिटन सरकारची मोठी तारंबळ उडाली. त्यामुळे या आजाराची गंभीरता आणखीनच वाढली आहे. पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिला होता. पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत कळवले होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
BreakingNews । कोरनाच्या संकटामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. ब्रिटनमध्ये तर राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.#Corona #Coronavirus #BorisJohnson @ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 7, 2020
गेल्या महिन्यात बोरिस जॉन्सन यांनी ट्विटरवरून आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून बोरिस जॉन्सन होम क्वारंटाईन होते. मात्र, आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवस उलटूनही बोरिस जॉन्सन यांच्यात कोरोनाची लक्षणे अजूनही दिसत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, प्रकृतित सुधारणा होत नसल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
UK Prime Minister Boris Johnson, who had tested positive for #Coronavirus late last month, has been taken to intensive care: UK media (File pic) pic.twitter.com/IWJSET3SEV
— ANI (@ANI) April 6, 2020