Joe Biden On Pakistan: जगातला सर्वात धोकादायक देश कोणता असेल तर तो पाकिस्तान आहे. हे मोठं वक्तव्य केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी. पाकिस्तान हे जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक आहे, असे ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. (Joe Biden Say Pakistan dangerous nations in world)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (United States President Joe Biden) यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या निवेदनात शुक्रवारी डेमोक्रॅटिक कॉंग्रेसनल कॅम्पेन कमिटी रिसेप्शनमध्ये अध्यक्षांच्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला. मला वाटते पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक आहे.
डेमोक्रॅटिक कॉन्फरन्सवेळी बायडेन यांनी हे सनसनीत वक्तव्य केल्यानंतर याची जोरदार चर्चा होत आहे. पाकिस्तानमधल्या अण्वस्त्रांवरुन त्यांनी हे विधान केले आहे. पाकिस्तान सैन्य आणि सरकार यांच्यात कोणताही ताळमेळ नाही, त्यामुळेच जगासाठी पाकिस्तान हा मोठा धोका असल्याचं ते यावेळी म्हणाले.
विशेष म्हणजे, ज्यो बायडेन चीन, व्लादिमीर पुतिन आणि रशियाच्या संदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर बोलत असताना पाकिस्तानवर हा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, मी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक देश मानतो.
"What I think is maybe one of the most dangerous nations in the world, Pakistan. Nuclear weapons without any cohesion", said US President Joe Biden at Democratic Congressional Campaign Committee Reception pic.twitter.com/cshFV5GVHY
— ANI (@ANI) October 15, 2022
ज्यो बायडेन यांनी पाकिस्तानबद्दल केलेले वक्तव्य पाकिस्तान-अमेरिका संबंधांना मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे पाकिस्तानचे शाहबाज शरीफ सतत प्रयत्न करत असताना, दुसरीकडे ज्यो बायडेन यांनी पाकिस्तानचे वर्णन जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबतचे संबंध पुढे कसे असतील याची झलक पाहायला मिळाली आहे. याशिवाय बायडेन म्हणाले, बरेच काही घडत आहे. पण, 21व्या शतकाच्या दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेसाठी मोठ्या संधी आहेत. याचा फायदा घेऊन महत्त्वाचे बदल घडवून आणता येतील.