Valentine Week 2023 : प्रेमाच्या उत्सवाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात; Rose Day पासून किस डेपर्यंत जाणून घ्या तारीख

Valentine Week 2023 Full List : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. जगभरात या महिन्याची प्रेमी युगुलापासून प्रत्येक जण वाट पाहत असतो. प्रेम आणि रोमान्सने भरलेला या महिन्यात खास व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. कधी सुरु होणार हा वीक जाणून घ्या.

Updated: Feb 6, 2023, 03:07 PM IST
 Valentine Week 2023 : प्रेमाच्या उत्सवाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात; Rose Day पासून किस डेपर्यंत जाणून घ्या तारीख title=
Valentines Week 2023 list schedule Rose Day Propose Day Chocolate Day Teddy Day Promise Day Hug Day Kiss Day Valentines Day Festival of Love in marathi

Happy Valentine Week 2023 Schedule : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा उत्साहाचा महिना. प्रेमाचा हा सण साजरा करण्यासाठी जगभरातील प्रेमी आणि विवाहित जोडपी आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेमाला सीमा नसते, ना प्रेम जाहीर करण्यासाठी कुठल्या मर्यादा...त्यामुळे हा प्रेमाचा उत्सव जोरात ( valentine's day 2023 events) साजरा करण्यासाठी व्हॅलेंटाइ वीक 2023 ची (Valentine Week 2023 Wishes) तेवढीच जोरदार सुरु आहे. तुमच्या जोडीदारा भेटवस्तू सोबतच प्रत्येक दिवसाला एक वचन देण्याचा हा आठवडा. जर तुम्ही पहिल्यांदाच कोणाला प्रपोज करणार असाल किंवा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइ वीक (Valentine Week 2023 Messages) साजरा करणार असाल. तर तुम्हाला प्रत्येक दिवसाबद्दल माहिती असणे गरजेचं आहे.  व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून म्हणजे मंगळवारपासून सुरू होतो आणि हा आठवडा 14 फेब्रुवारीपर्यंत चालतो. प्रेम व्यक्त करणारे आणि प्रपोज करणारे जोडपे व्हॅलेंटाईन वीकची (valentine's day 2023 countdown) आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येक दिवसाचं वेगळा अर्थ आहे, तो जाणून घेऊयात. (Valentines Week 2023 list schedule Rose Day Propose Day Chocolate Day Teddy Day Promise Day Hug Day Kiss Day Valentines Day Festival of Love in marathi)

7 फेब्रुवारी, रोज डे (Rose Day) 

व्हॅलेंटाइन वीकला 7 फेब्रुवारीपासून म्हणजे मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. पहिला डे असतो तो म्हणजे रोज डे...प्रेमाचं प्रतिक म्हणजे गुलाबाचं फुलं. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाब दिला जातो. हे गुलाब देऊन आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करतो. 

8 फेब्रुवारी, प्रपोज डे (Propose day) 

आता दुसरा दिवस असतो तो म्हणजे प्रपोज डे...या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीजवळ आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आजकाल मार्केटमध्ये प्रपोज डेसाठी अनेक मेसेज आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीचे कार्ड मिळतात. अनेक जण या दिवसाला खास करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढतात. 

9 फेब्रुवारी, चॉकलेट डे (Chocolate Day)

व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे...आता रोज देऊन प्रपोज करुन झालं आता या नात्यात कायम गोडवा राहावा म्हणून तिसऱ्या दिवशी चॉकलेट दिलं जातं. 

10 फेब्रुवारी, टेडी डे (Teddy Day)

 व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी म्हणजे टेडी डे. गुलाबाप्रमाणेच टेडी हा प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. टेडी हा मुलींना खूप आवडतो. कोमल हृदयाचा हा प्राणी प्रेमात जवळीक आणि विश्वास निर्माण करतो. 

11 फेब्रुवारी, प्रॉमिस डे (Promise Day)

 व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो. कारण यादिवशी एकमेकांना प्रेमाचे वचन देण्याचा दिवस असतो. 

12 फेब्रुवारी, हग डे (Hug Day)

  व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस म्हणजे हग डे. या दिवशी प्रेमळ जोडपे एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. यातून ते एकमेकांबद्दलची आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करतात. 

13 फेब्रुवारी, किस डे (Kiss Day)

व्हॅलेंटाईन वीकच्या सातव्या दिवशी किस डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.

14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)

आता या वीकचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे...या वीकची सांगता करण्याचा दिवस प्रेमी जोडपे हा दिवस खूप खासप्रकारे साजरा करतात. हा दिवस खास करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्लॅन केले जातात. एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या जातात. अशाप्रकारे हा प्रेमाचा महिना साजरा केला जातो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)