Girls Fight Video : असं म्हणतात महिलांना किंवा तरुणींना भांडण्यासाठी कारण लागतं नाही. लोकल ट्रेनमध्ये (Local train) जागेवरून, शेजारणींसोबत कचऱ्यावरून अगदी कुठलंही कारण चालतं. यापूर्वी आपण जीममध्ये महिलांचा राडा पाहिला आहे. लहान मुलांना शाळेत हाणामारी करताना पाहिलं आहे. पण तुम्ही कधी परदेशी तरुणींचा राडा पाहिला आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (video viral on social media) होतो आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुणी एकमेकांचे पहिले केस ओढतं आहे. त्यानंतर या तरुणींनी क्लासरुमला WWE चा आखाडाच बनवला. क्लासरुममध्ये मुलींची Free style fighting सुरु झाली. या तरुणी एकमेकींना मारण्यात इतक्या मग्न होत्या की त्यांना आजूबाजूचा कसलाही भान राहिला नाही. तिथे टेबलवर असलेल्या लॅपटॉपही त्यांनी खाली पाडला. (video Girls Fight in classroom viral on Social media nmp)
हेही वाचा - Video : लिफ्टमध्ये अचानक प्रेत चालायला लागलं अन् पुढे जे घडलं...
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या दोघींचं भांडण ज्या कारणावरुन झालं ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. आपल्या दोघींमध्ये कोण जास्त Hot आहे यावरून या तरुणींमध्ये वाद सुरु झाला आणि नंतर या वादाचं रुपांतर हाणामारी झालं.
Kalesh B/w Girls over Who’s more Hotterpic.twitter.com/pyuSGjpRwf
— BaharKeKalesh (@Baharikekalesh) November 11, 2022
हा व्हिडीओ @Baharikekalesh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून (Twitter account) शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दोघांमध्ये कोण जास्त हॉट आहे यावर भांडत आहेत. तर हा व्हिडीओ बेस्ट गर्ल्स फाईट या पेजवरही शेअर करण्यात आला आहे. त्याला कॅप्शन दिलं आहे की Rip Laptop.