आपली पृथ्वी (Earth) अवकाशातून कशी दिसते?, ती गोल-गोल कशी फिरते?, हा सर्वांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. तुम्ही अनेक पुस्तकांमध्ये हे वाचलं असेल की, अवकाशातून (Space) पाहिल्यावर आपली पृथ्वी निळ्या गोलाकार वस्तूसारखी दिसते, कारण पृथ्वीचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. त्याचवेळी अंतराळवीरांवर विश्वास ठेवला तर अंतराळातून पृथ्वी पाहण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा आणि विशेष आहे. त्यांना असे दृश्य पाहायला मिळते, ज्याची त्यांना अपेक्षाही नव्हती. या सर्व गोष्टी सर्वसामान्यांना विचार करायला भाग पाडतात, कारण त्यांनी कधी अंतराळातून पृथ्वी पाहिली नाही किंवा ते दृश्य पाहणे त्यांच्या नशिबातही नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतोय, ज्यामध्ये अंतराळातून पृथ्वीचे दृश्य अप्रतिम आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की धूळ आणि राख असे काहीतरी दिसत आहे तसेच अनेक ठिकाणी ज्वाळांचे दृश्यही दिसत आहे. कुठे प्रकाश तर कुठे गडद तर कधी निळा रंग दिसतो. मग मधोमध एका ठिकाणी वाळवंटासारखे दृश्य दिसते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पृथ्वीचे विस्मयकारक दृश्य पाहायला मिळते. सायन्स फिक्शन चित्रपटातही इतकी सुंदर दृश्ये तुम्ही पाहिली नसतील. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अवकाशातून संपूर्ण पृथ्वी पाहण्याची संधी मिळते. यामुळे, हा एक अतिशय खास आणि अद्भुत व्हायरल व्हिडिओ म्हणता येईल.
Earth at night from space. pic.twitter.com/QnbCQE4Cf9
— Cosmic Gaia (@CosmicGaiaX) May 16, 2022
हा 'विलक्षण' व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @CosmicGaiaX या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये म्हटले आहे की 'पृथ्वीचे अंतराळातून दिसणारे रात्रीचं दृश्य' (Earth at night from space). 34 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 4.2 मिलियन म्हणजेच 42 लाख व्ह्यूज मिळालेत, तर 51 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अंतराळातून पृथ्वीचे हे दृश्य आश्चर्यकारक असल्याचे वर्णन केले आहे, तर काहींनी हा बनावट व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे.