Undertaker and Kane Brothers: जर तुम्ही 90 च्या दशकात जन्माला आलेले असाल तर WWE बद्दल वेगळं सांगायची गरज नाही. एक वेळ होती जेव्हा WWE ची प्रचंड क्रेझ होती. त्या काळात रामायण, महाभारत, शक्तिमान, मोगली, अलिफ लैला, टॉम अॅण्ड जेरी यासह आणखी एका गोष्टीसाठी लहान मुलं टीव्हीला चिकटून बसलेली असायची आणि ते म्हणजे WWE. यामधील हल्क हॉगन (Hulk Hogan), ट्रिपल एच (Triple H), रॉक (Rock), शॉन मायकल्स (Shawn Michaels), रिकीशी (Rikishi), स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन (Stone Cold Steve Austin), जॉन सीना (John Cena), केन (Kane), अंडरटेकर (Undertaker) असे अनेक रेसलर आजही अनेकांच्या लक्षात आहेत.
या WWE बद्दल अनेक चर्चाही असायच्या, ज्यापैकी काही अफवा असूनही सत्य मानलं जायचं. जसं की, Undertaker मेल्यावर पुन्हा जिवंत होतो. यामधील एक चर्चा म्हणजे Kane आणि Undertaker भाऊ असल्याची होती. पण हे सत्य होतं का?
WWE चा उल्लेख केल्यावर केन आणि अंडरटेकचं नाव घेतलं जाणार नाही असं शक्य नाही. एकीकडे अंडरटेकरची वेगळी क्रेझ असताना चेहऱ्यावर नेहमी मास्क घालणाऱ्या केनबद्दलही प्रचंड कुतुहूल असायचं. ज्यावेळी क्रेनने चेहऱ्यावरील मास्क काढलं होतं, त्यानंतर ही क्रेझ अजूनच वाढली होती. त्यात जर अंडरटेक आणि केन आमने-सामने असायचे तेव्हा ती फाईट पाहणंही लहान मुलांसाठी पर्वणी असायची. दोन भावांपैकी कोण जिंकणार अशी चर्चा रंगायची. पण तुम्ही लहानपणापासून जे समजत होतात, तसे हे दोघे सख्खे भाऊ नाहीत.
WWF मध्ये केन आणि अंडरटेकर भाऊ दाखवण्यात आले होते. यादरम्यान ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन (Brothers of Destruction) सीरिजसाठी दोघांनी अनेक फाईट लढल्या. यादरम्यान दोघे सख्खे भाऊ असल्याचा समज निर्माण झाला होता. पण तुमची माहिती पूर्ण चुकीची नाही. केन आणि अंडरटेकर भाऊ आहेत, पण सख्खे नाहीत. दोघेही सावत्र भाऊ आहेत. केनने एका मुलाखतीत आपण अंडरटेकरला सख्ख्या भावाप्रमाणेच मानत असल्याचं म्हटलं होतं.