नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन सतत भारतावर टीका करणा-या चीनी मीडियाने आता भारतावर टीका करने बंद करुन मैत्रीचे गोडवे गाणे सुरू केले आहे. भारत आणि चीन यांच्यातील वादात चीनी मीडिया हाऊस शिन्हुआ न्यूजने नेहमीच तेल ओतण्याचं काम केलंय.
काही दिवसांपूर्वीच या चॅनेलने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून भारताची खिल्ली उडवली होती.
Sober, cooperative solution is in need to tackle China-India border standoff (#DoklamStandoff). Watch our latest #TalkIndia program for more pic.twitter.com/VcnEwv3nDc
— China Xinhua News (@XHNews) August 20, 2017
Will #BRICS shine more brightly in the future? Watch our latest #TalkIndia program for more pic.twitter.com/t7uqJPktS5
— China Xinhua News (@XHNews) August 21, 2017
आता मात्र या चॅनेलने भारत विरोधी आक्रामकपणा कमी केला असून, Talk india नावाच्या एका शो च्या माध्यमातून दोन्ही देशातील संबंध सुरळीत व्हावे असं म्हटलंय. या कार्यक्रमासंबंधी एका व्हिडिओत दोन्ही देशांनी शांतता राखत डोकलाम वाद मिटण्याचा सल्ला दिला आहे.
व्हिडिओत म्हटलं आहे की, ‘आशिया चीनी ड्रॅगन आणि भारतीय हत्तींचा आहे. आम्ही जन्माने शत्रू नाही आहोत. दोन्ही देशांचा मोठा सांस्कृतिक इतिहास आहे’. या व्हिडिओत दोन्ही देशांच्या संस्कृतीचं उदाहरण देत म्हटलं आहे की, दोन्ही देश जन्मापासून दुश्मन नाहीयेत. त्यामुळे भारताने चीनच्या क्षेत्रातून आपले सैनिक मागे घेतले पाहिजे.