मलेशिया : झाकीर नाईकवर मलेशियात भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं निर्णय घेतल्याची मलेशियन पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान मलेशियात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप झाल्यानंतर आणि मलेशियातल्या मेलका राज्याने झाकीर नाईकवर बंदी आणल्यानंतर आता झाकीर नाईकने माफी मागितली आहे. मलेशियन हिदूंविषयी केलेल्या विधानाबाबत अखेर त्याने आपला माफीनामा सादर केला. झाकीरने केलेल्या विधानानंतर पोलिसांनी आठ तास झाकीर नाईकची कसून चौकशी केली.
याआधी मलेशियातिल सहा राज्यांनी त्याच्यावर बंद घातली होती. त्यामुळे आता मलेशियातून आपली हकालपट्टी होतेय की काय असं वाटताच झाकीर नाईकने कांगावा करत अखेर आपल्या विधानाबाबत माफी मागितली. भारतात वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू डॉ.झाकीर नाईकवर प्रक्षोभक भाषण करणे, तसेच आर्थिक गैरव्यवहार आणि परकीय चलनाची अफरातफर करणे असे विविध आरोप आहेत.