कोमल वावरकर झी मीडिया, मुंबई : आज राष्ट्रीय क्रीडा दिवस. जगभरात, 'हॉकीचा सर्वोत्तम खेळाडू', म्हणून प्रसिद्ध मेजर ध्यानचंद यांची ख्याती जगभरात कायम आहे. ध्यानचंद यांचा वाढदिवस हा भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांनी भारताला Olympicsमध्ये सलग ३ सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत.
ध्यानचंद यांनी आपल्या खेळातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या काळात जेव्हा हॉकीची चर्चा होत होती किंवा आजही हॉकीचा इतिहास त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचा जादूगार' म्हणून ओळखलं जातं. राष्ट्रीय क्रीडा दिवसाला खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरवलं जातं.
मेजर ध्यानचंद हे वयाच्या १६ वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्या काळात हॉकी या खेळात अनेक बदल होत होते. ध्यानचंद यांचं नाव हॉकी विश्वात सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून ओळखलं जातं.
ध्यानचंद यांचं मूळ नाव 'ध्यान सिंग' त्यांना लहानपणापासूनच खेळ खेळायला आवडत असे. या हॉकीच्या जादुगाराने भारताला विश्वात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. ज्या काळात खेळाविषयी गोष्टी उपलब्ध देखील नव्हत्या, त्या काळात ध्यानचंद १९२८ मध्ये खूप मोठा पराक्रम करून दाखवला.
एम्स्टर्डम ऑलिम्पिक १९२८
ध्यानचंद यांनी १९२८ साली एम्स्टर्डम ऑलिम्पिक स्पर्धत इंग्लंडमध्ये ११ मॅच खेळले.
ध्यानचंद १९२८ साली एम्स्टर्डम ऑलिम्पिक स्पर्धेत खेळले. या स्पर्धेतील एकूण ११ सामन्यांमध्ये खेळण्याची त्यांना संधी मिळाली. या स्पर्धेत भारताला मोठं यश आलं होतं. कारण सर्वच्या सर्व सामने भारताने जिंकले होते. १७ मे १९२८ रोजी ऑस्ट्रिया ६-०,, १८ मे रोजी बेल्जियम ०९-०, २० मे रोजी डेन्मार्क या देशाला ५-०, २२ मे रोजी स्वित्झर्लंडला ६-० आणि २६ मे रोजी हॉलंड या देशाचा पराभव करून भारताने विजय मिळवला होता.
ध्यानचंद यांना २९ ऑगस्ट या रोजी पदक देऊन गौरवण्यात आलं होतं, ध्यानचंद यांनी अखेरच्या सामन्यात २ गोल मारले होते. १९२८ - १९५६ हा काळा हॉकीसाठी सुवर्णकाळ होता. याच काळात भारताने Olympics मध्ये सलग तीन वेळेस सुवर्णपदक पटकावले होते.
लॉस एंजेलस ऑलिम्पिक १९३२ : लॉस एंजेलसमध्ये झालेल्या स्पर्धत भारताने अमेरिकेला २४ - १ ने हरवले होते. तेव्हा अमेरिकेच्या एका वृत्तपत्रात फक्त भारताचा उदो - उदो होता. त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की, पूर्वेकडून वादळ आलं आहे आणि त्यावेळी जगात भारताची फार प्रशंसा झाली होती. त्यामुळे भारताच नाव हॉकी खेळाच्या बाबतीत जगात एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोहचलं. त्यावेळी अमेरिकेच्या खेळाडूंना मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. या संपूर्ण यात्रेत ध्यानचंद यांनी २६२ मधून १०१ गोल केले होते.
बर्लिन (१९३६) : बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंदच्या उत्तम खेळामुळे हिटलर प्रभावित झाला होता. त्यामुळे हिटलरने त्यांना जर्मन नागरिकत्व आणि जर्मन सैन्यात पद दिलं. मात्र या भारतीय जादुगाराने ते पद नाकारलं. त्यांच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी तब्बल ४०० गोल केले होते.
नेदरलँडच्या सामन्यात हॉकी ऑथोरिटीने, अक्षरशः ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकचे तुकडे करून चाचणी घेतली होती. मात्र ध्यानचंद यांच्या स्टिकमध्ये चुंबक आढळलं नाही. त्यांच्या खेळामुळे हॉकी विश्वातच नाही, तर संपूर्ण खेळ जगात त्यांची लोकप्रियता वाढली होती.
क्रिकेटचे सुपरहिरो Sir Don Bradman म्हणत असतं, क्रिकेटमधल्या रन्ससारखे ध्यानचंद गोल्स करतात. मेजर ध्यानचंद यांच्यामुळे भारताच नाव हॉकी विश्वात अव्वल झालं.
सन्मान : ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २९ ऑगस्ट १९०५ अलाहाबादमध्ये संयुक्त प्रांत, ब्रिटिश भारत यांच्या वतीनं ध्यानचंद यांचा वाढदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी घोषणा करण्यात आली.
२९ ऑगस्टला खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूना त्यांच्या ध्यानचंद यांच्या नावाने अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार यांना दिले जातात. ध्यानचंद यांना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने शतकवीर खेळाडू म्हणून घोषित केले. सध्या ध्यानचंद यांनाही भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे.