रत्नागिरी : अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. असे असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या सर्वरवर सायबर हल्ला । कुलगुरू आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती । विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचं सामंत यांचे आश्वासन @ashish_jadhao @samant_udayhttps://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/oXLItRc7h6
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 7, 2020
परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचं यात कोणतही नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी विशेष गट कार्यरत आहे. तर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याची माहिती मुंबई विद्यापाठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान ही यंत्रणा कोलमडून टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत असून त्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली. शिवाय, विरोधकांना काहीही काम नसून परिक्षांबाबत समस्या येत असली तरी याबाबत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे देखील यावेळी उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.