Akshay Kumar Biggest Comedy Film: बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमारच्या नावावर असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाहीये. अक्षय कुमार बॉक्स ऑफिस इंडियाच्या 'सक्सेस काउंट एक्टर ऑल टाइम' यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला फ्लॉप चित्रपटांना सामोरे जावे लागत आहे. असे जरी असले तरी अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये सर्वात मोठा हिट चित्रपट दिला आहे. जो त्याचा सर्वात मोठा कॉमेडी चित्रपट ठरला. आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील अशाच एका सर्वात मोठ्या कॉमेडी चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 1991 मध्ये 'सौगंध' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. यानंतर 1992 मध्ये अक्षय कुमारचा 'खिलाडी' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले. आतापर्यंत अक्षय कुमारने 145 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मिस्टर अँड मिसेस खिलाडी
28 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997 मध्ये अक्षय कुमारचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. हा चित्रपट डेविड धवनने दिग्दर्शित केला होता. अक्षय कुमारसह या चित्रपटात सतीश कौशिक, जूही चावला, कादर खान, हिमानी शिवपुरी, जॉनी लीवर, गुलशन ग्रोवर आणि परेश रावल सारखे दिग्गज कलाकार दिसले होते. अक्षय कुमारचा हा चित्रपट मनोरंजनाने परिपूर्ण असून प्रेक्षकांना तो खूप आवडला होता. आम्ही अक्षय कुमारच्या 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी' या हिट चित्रपटाबद्दल बोलत आहोत.
या चित्रपटात अक्षय कुमारने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि जुही चावलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. अक्षयचा हा पहिला कॉमेडी चित्रपट आहे, जो पाहताना तुम्हाला नॉन स्टॉप हसायला लावतो. त्याची कथा एका मुलाभोवती फिरते जो आळशी आहे आणि जो एक दिवस राजा बनण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तो नेहमी त्याच्या ज्योतिषी काकांच्या प्रभावाखाली येतो आणि एका श्रीमंत माणसाच्या मुलीशी लग्न करतो. अक्षय कुमारचा हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खूप आवडतो. हा चित्रपट अक्षयच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. चित्रपटाचे बजेट 5.75 कोटी रुपये होते. या चित्रपटाने 16.75 कोटींची कमाई केली.