मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान कायम चर्चेत असते. कधी बोल्ड फोटो तर कधी बॉयफ्रेंडसोबत असलेलं नातं. पण आता आयरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आमिरची लेक आयराला एक गंभीर आजार झाला आहे. अटॅक येत असल्याची माहिती खुद्द आयराने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. आयराने स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत तिने समोर येत असलेल्या अडचणी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितल्या आहे.
आयरा म्हणते. 'मला आता एंग्जायटी अटॅक येत आहेत. कधी-कधी मला फार भीती वाटते, मला रडायला देखील येत... पण असे ही दिवस असतात तेव्हा मी प्रचंड आनंदी असते. ण यापूर्वी कधीही मला एंग्जायटी अटॅक आलेले नव्हते.'
'पॅनिक विरुद्ध पॅनिक आणि एंग्जायटी विरुद्ध एंग्जायटी अटॅक यातील मोठा फरक आहे. एंग्जायटी अटॅक हृदयाचे ठोके वाढतात. श्वासाची गती वाढणे... चीड-चीड होते.. रडायला येत... सतत काही तरी भयंकर घडणार असं वाटत असतं....'
आयरा पुढे म्हणते, 'अशा परिस्थितीत मी स्वतःशीच बोलते. पण या काळात बॉयफ्रेंडशी बोलण्याने मला खूप मदत होत आहे. काही तास तरी मला रिलॅक्स वाटतं. या आजारातून मी बाहेर येण्याचा प्रयत्न केला आहे... ' असे आयराने या पोस्टमध्ये म्हटले आहे.