आमिरची 'गोरी मेम' आज अशी दिसतेय की ओळखताही येणार नाही

चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं.   

Updated: Jan 25, 2022, 02:42 PM IST
आमिरची 'गोरी मेम' आज अशी दिसतेय की ओळखताही येणार नाही title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आमिर खान, ग्रेसी सिंग आणि सहकलाकारांच्या अभिनयानं नटलेला  'लगान' (Lagaan)हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. आमिरच्या कारकिर्दीतील आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं. 

चित्रपटामध्ये बऱ्याच परदेशी कलाकारांचीही वर्णी लागली होती. त्यातली एक गाजलेली भूमिका होती, एलिझाबेथ रसेल अर्थात 'गोऱ्या मेम'ची.

तुम्हाला माहितीये का ही 'गोरी मेम' 20 वर्षांनंतर नेमकी कशी दिसते ? 

अभिनेत्री रशेल शॅले हिनं चित्रपटात कॅप्टन रसेलच्या बहिणीची अर्थात एलिझाबेथची भूमिका साकारली होती. 

एकाएकी रशेलच्या फॅन पेजवरून तिचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये तिचं रुप पाहताना लगेचच आपण चित्रपटातली एलिझाबेथ आठवू लागतो. 

रशेलचं स्वत:चं इन्स्टाग्राम अकाऊंट नाही. ती सोशल मीडियापासून दूरच असते असं म्हटलं जातं. पण, फॅन पेजवर मात्र तिचे फोटो पोस्ट होतच असतात. 

रशेलनं अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्य़े तिला 'लगान'  मधूनच पाहता आलं. 

या चित्रपटानं ऑस्करच्या शर्यतीतही स्थान मिळवलं होतं. रशेल अभिनयासोबतच लेखन क्षेत्रातही सक्रिय आहे. शिवाय ती मॉडेलिंगही करते. 

'द एल वर्ड' या सीरिजमध्ये तिला हेलेना पीबॉडीचं पात्र साकारण्यासाठीही ओळखलं जातं. 

एका परदेशी अभिनेत्रीवर भारतीयांचं असणारं प्रेम नेमकं काय असतं हे रशेलनं साकारलेल्या एलिझाबेथला मिळणाऱ्या आपुलकीतून स्पष्ट होतं.