Abhishek Bachchan Birthday Special : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा लोकप्रिय अभिनेता आहे. आज त्याचा 47 वा वाढदिवस आहे. अभिषेकनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सगळ्यांना वाटले की तो वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासारखा असेल. मात्र, अभिषेकनं घेतलेल्या काही चूकिच्या निर्णयांमुळे तो करिअरच्या सुरुवातीच्या 4 वर्षांमध्ये स्ट्रगलच करत होता. वयाच्या 9 व्या वर्षी अभिषेकनं डिस्लेक्सियासारख्या आजाराशी झुंज दिली. सुपरस्टारचा मुलगा असूनही त्याचे आयुष्य इतके सोपे नव्हते. अमिताभ कर्ज बाजारी असताना अभिषेकला शिक्षण सोडावे लागले होते आणि स्वतःच्या कंपनीत Spotboy सारखे कामही केले. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी त्यानं निर्मात्यांच्या फेऱ्याही मारल्या. इतकंच काय तर त्यानं एलआयसी (LIC) एजंट म्हणूनही काम केलं होतं.
आर्थिक अडचणींमुळे अभिषेकने शिक्षण सोडलं होतं. त्यावेळी अभिषेक बॉस्टन युनिव्हर्सीटीत शिकत होता. 1999 साली अमिताभ यांची अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) कंपनी तोट्यात जात होती. त्यामुळे अभिषेक भारतात परतला आणि त्यानं अमिताभ यांच्या कंपनीत स्पॉट बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
चित्रपटांमध्ये करिअर करण्यापूर्वी अभिषेकचा एलआयसी एजंट बनण्याचा हेतू होता. ज्यासाठी त्यानं प्रचंड मेहनत केली होती आणि त्यात काम केले. मात्र, काही काळानंतर त्यानं बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2000-2004 या चार वर्षांत अभिषेकने 17 फ्लॉप चित्रपट केले. याचे कारण म्हणजे अभिषेक चित्रपटाच्या स्क्रिप्टकडे लक्ष न देता थेट चित्रपट साइन करायचा. यानंतर, 2004 मध्ये त्याने धूम चित्रपटात काम केले, जो ब्लॉकबस्टर वर हिट ठरला. यानंतर त्यानं 'बंटी और बबली', 'युवा', 'ब्लफमास्टर', 'गुरू' सारखे हिट चित्रपटांमध्ये काम केले.
हेही वाचा : 'संस्कारी बाबूजी' Alok Nath आऊट ऑफ कंट्रोल? चक्क दारूच्या नशेत केलं 'ते' कृत्य
स्टार किड असूनही अनेक चित्रपट निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये अभिषेकला जावे लागले. अभिषेकला त्याच्या करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 2000 मध्ये अभिषेकनं जे. पी. दत्ता यांच्या 'रिफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण त्याचा पहिल्या चित्रपटापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. अभिषेकने एकदा त्याच्या संघर्षाची कहाणी सांगितली होती की, त्याचे करिअर राकेश ओम प्रकाश मेहरासोबत सुरू होणार होते. ओम प्रकाश यांनी त्यांना 'समझौता एक्सप्रेस' नावाची स्क्रिप्ट सांगितली होती, ज्यावर ते दोघे काम करणार होते. पण खूप मेहनत करूनही त्याला लॉन्च करायला कोणी मिळालं नाही