श्रुती हसनचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल हैराण... पाहा Video

ज्यामध्ये ती गॅरेजमध्ये डान्स करताना दिसत आहे.

Updated: Sep 5, 2022, 08:58 PM IST
श्रुती हसनचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल हैराण... पाहा Video title=

Shruti Haasan Dance Video: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय सौंदर्यवती श्रुती हासनने बॉलिवूड इंडस्ट्रीत चांगली कामगिरी केली आहे. याशिवाय ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यासोबतच ती चाहत्यांनाही सोशल मीडियावरून अपडेट करत असते. यावेळी श्रुतीने तिचा (Shruti Haasan) डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गॅरेजमध्ये डान्स करताना दिसत आहे. (actor kamal haasans daughter shruti haasans new video goes viral netziens reacts)

श्रुती हासनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये ती चक्क गॅरेजमध्ये डान्स करताना दिसते आहे. तिने यावेळी दोन केसांच्या पोनीसह काळ्या लेदर जंपसूट घातला आहे आणि राजा कैया वच्छा या गाण्यावर ती नाचताना दिसत आहे.

काळ्या रंगाच्या पोशाखात ती खूपच मस्त दिसत आहे. तिच्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. 

श्रुती हासनने अलीकडेच गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित तिच्या आगामी NBK107 चित्रपटासाठी बालकृष्णासोबत तुर्कीमध्ये शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रुती हासन चिरंजीवीच्या आगामी मास एंटरटेनर, Chiru154 या चित्रपटाचे शूट करते आहे. निर्मात्यांनी हैदराबादमध्ये चित्रपटाचे आणखी एक महत्त्वाचे आणि लांबचे शेड्यूल सुरू केले आहे.