मुंबई : मल्याळम आणि तामिळ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा यांचे निधन झाले आहे. 56 वर्षीय नलनाई चित्रा यांना शनिवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अभिनेत्री चेन्नईतील घरी होत्या.
80 च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं इंडस्ट्रीमध्ये तीन दशके खूप नाव कमावले. त्यांनी मल्याळम आणि तमिळमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपासून चित्रा एका तामिळ मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.
मल्याळम आणि तमिळ व्यतिरिक्त चित्रा यांनी तिच्या कारकिर्दीत कन्नड आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी 'राजिया' आणि 'एक नई पहेली' या दोन हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. याशिवाय तिने अनेक दक्षिण भारतीय टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. चित्राचा जन्म 21 मे 1965 रोजी कोची, केरळ येथे झाला.
चित्रा नव्वदच्या दशकात तिच्या करिअरच्या शिखरावर होत्या. त्यांनी प्रेम नजीर यांच्यासह मोहनलाल, सुरेश गोपी आणि ममूट्टी या दिग्गजांसोबत काम केले. त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये 'अट्टकलासम', 'कमिशनर', 'पंचगणी', 'देवासुरम', 'अमरम', 'एकलव्य्यान', 'रुद्राक्ष' आणि 'मिस्टर बटलर' यांचा समावेश आहे.