वयाच्या 40 साव्या वर्षी दोन मुलींची आई, वजनामुळे ट्रोल झाल्यावर नेटकऱ्यांना सुनावले खडेबोल

Debina Bonnerjee on Body Shaming: अभिनेत्रींना कायमच ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. तेव्हा अनेक अभिनेत्री त्यावर मौन तरी पाळतात नाहीतर खुलेआपपणे बोलताही दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं आपल्याला बॉडी शेमिंगवरून ट्रोल केल्यानं खडेबोल सुनावलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 7, 2023, 07:47 PM IST
वयाच्या 40 साव्या वर्षी दोन मुलींची आई, वजनामुळे ट्रोल झाल्यावर नेटकऱ्यांना सुनावले खडेबोल title=
(Photo : Debina Bonnerjee | Instagram)

Debina Bonnerjee on Body Shaming: बॉलिवूडचं नाही तर टेलिव्हिजनच्याही अनेक अभिनेत्री आपल्या अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे. या अभिनेत्रीचे नावं आहे देबिना बॅनर्जी. गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनी 2008 च्या आसपास लग्न केले. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर ते दोघंही दोन मुलींचे आईवडिल झाले आहेत. दोघंही इन्टाग्रामवर चांगलेच सक्रिय असतात. त्यामुळे त्यांची इंटरनेटवरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. देबिना ही युट्यूबवरही सक्रिय असते आता आई आल्यानंतर ती मातृत्वाशी संबंधितही टीप्सही देताना दिसते. अशाच एका वीलॉगमधून तिनं आपल्या बॉडी शेमिंगच्या अनुभवाबद्दलही सांगितले आहे. आपलं वजन वाढल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आले होते त्यावर तिनं भाष्य केले आहे. 

आपल्या लेकीच्या कानाच्या पिअरसिंग कार्यक्रमाला तिनं एक ड्रेस घातला होता. तेव्हा तिला या ड्रेसवरून ट्रोल करण्यात आले होते. तिनं तिच्या एका व्हिलॉगमध्ये सांगितले की, तिला हा ड्रेस लॉकडाऊनच्या आधी गिफ्ट करण्यात आला होता. परंतु जेव्हा तिनं हा ड्रेस घातला तेव्हा तिला वजन वाढल्यामुळे ट्रोल करण्यात आले. तिला तुझ्यावर हा ड्रेस सुट होत नाही असं ट्रोलर्सकडून सांगण्यात आले. तू जाड दिसते आहेस असंही सांगण्यात आले. तेव्हा याबद्दल तिनं स्वत:च खुलासा करत सांगितले की, मला ट्रोल केल्याचा त्रास मला झाला नाही. त्यामुळे मी फार डिस्टर्ब झाले नाही. मला माहितीये त्या काळात मी किती आळशी झाले होते ते त्यामुळे मला याचा त्रास झाला नाही. मी स्वत:हून डायटिंग सुरू केले आहे. त्यासोबत मी व्यायमही करते. 

तिच्या दुसऱ्या मुलीच्या पिअरसिंगच्या वेळी तिनं आपल्या या अनुभवाबद्दल सांगितले आहे. गुरमित आणि देबिनानं रामायण या मालिकेतून एकत्र काम केले होते. त्यानंतर ते एकत्र एका रिएलिटी शोमध्ये दिसले आणि त्यानंतर मग त्यांनी लग्न केले. तेव्हापासूनच ते एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांच्या अफेअरचीही चर्चा रंगली होती. देबिना आणि गुरमित गेली अनेक वर्ष एकत्र आहेत. त्यांचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहे. ते दोघंही आपल्या मुलींसोबतचा एकत्र वेळ आणि त्यांच्यातील गमतीजमती सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. 

हेही वाचा - आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; 'रामशेज' चित्रपटाची घोषणा

त्यांच्या या व्हिडीओज प्रचंड लाईक्सही येताना दिसतात. सध्या देबिनाची चर्चा रंगली आहे. गुरमित हा ओटीटीवर आपलं नशीब आजमावतो आहे.