मुंबई : लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची बबिता जी उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला आज कोण ओळखत नाही. तिने आज आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? की आज सर्वांची लाडकी मुनमुन दत्ता एका टप्प्यावर लैंगिक शोषणाची शिकार झाली होती आणि त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरंही जावं लागलं आहे.
2017 मध्ये मुनमुन दत्ताने खुलासा केला होता की, तिचा काका, चुलत भाऊ आणि शिक्षक यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केला होता. तिने एका पोस्टमध्ये या बाबतची माहिती देत लिहिलं होतं की, "असं काहीतरी लिहिताना मला त्या आठवणी आठवून रडू येतं. कारण मला लहानपणी माझ्या शेजारी राहणार्या काकांची भीती वाटायची, कारण जेव्हा ते मला एकटे दिसायचे तेव्हा ते मला पकडून ठेवायचे आणि हे गुपित ठेवण्याची धमकी द्यायचे.
त्याच बरोबर, माझा मोठा चुलत भाऊ जो मला त्याच्या बहिणीपेक्षाही वेगळ्या नजरेने बघायचा. तो मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करायचा कारण मी तेव्हा किशोरवयीन होते. 'वयाच्या 13 व्या वर्षी माझ्या ट्यूशन टीचरने माझ्या इनरवेअरमध्ये हात घातला होता, त्यावेळी मला हे माझ्या आई-वडिलांना कसं सांगावं हेच समजत नव्हतं. तो शिक्षक वर्गातल्या विद्यार्थिनींच्या ब्राचा पट्टा ओढायचा आणि त्यांना मारायचा.
तिने पुढे लिहिलं, 'हे सगळं का? कारण मी खूप लहान होती आणि त्यावेळी बोलायला घाबरत होती. हे इतकं भितीदायक आहे की, तुमच्या पोटात गोळा येतो आणि तुमचा गळा दाबल्यासारखं वाटतं... हे तुमच्या पालकांना कस समजावून सांगायचं हे तुम्हाला कळत नाही किंवा तुम्हाला कोणाला एक शब्दही सांगायला लाज वाटते. यानंतर पुरुषांबद्दल माझ्या मनामध्ये एक विचित्र द्वेष निर्माण होऊ लागला. कारण मला वाटयचं की प्रत्येक पुरुष हा अपराधी असतो.
अशा हृदयद्रावक घटनांमधून सावरण्यासाठी अनेक वर्षे लागतात... पण मी MeToo सारख्या मोहिमेद्वारे माझा स्वतःचा भूतकाळ सांगू शकले याचा मला आनंद आहे. मला लोकांना याची जाणीव करुन द्यायची आहे की, मलाही लोकांनी सोडलं नाही, पण आज जो कोणी माझ्याशी असं करण्याचा प्रयत्न करेल, मी त्याला फाडून टाकीन."
अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच तिच्या धाडसाचं सर्वस्तरावरुन कौतूक होत होतं. अभिनेत्रीची ही पोस्ट जुनी असली तरी सोशल मीडियावर ही पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.