Actress Talked About Her Breakup With Foreign Boyfriend : 'बिग बॉस ओटीटी 3' स्पर्धकांपैकी एक म्हणजे पॉलमी दास. पौलमी ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. शोमध्ये तिचं दुसरे स्पर्धक शिवानी कुमारसोबत अनेकदा स्पॉट झाली. पौलमी आतापर्यंत अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. आता पौलमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिनं शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की कशा प्रकारे तिचं इटॅलियन बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं आणि त्या ब्रेकअपमुळे तिला काय काय सहन करावं लागलं.
पौलमी ही त्याच्यासोबत 2021 मध्ये रिलेशनशिपमध्ये आली आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघं विभक्त झाले. याविषयी बोलताना पौलमी म्हणाली, 'आम्ही आधी आकांत प्रेमात होतो, पण कधी-कधी फक्त प्रेमानं नातं टिकून राहतं असं नाही. आम्ही खूप चॅलेन्सचा सामना केला आणि तेव्हा आम्हाला ही गोष्ट जाणवली की आम्ही विभक्त व्हायला हवं. त्याची इच्छा होती की मी हाउसवाइफ व्हायला हवं आणि मला हे मान्य नव्हतं. मी जेव्हा 16 वर्षांची होते तेव्हा पासून काम करते.'
पौलमीनं सांगितलं की 'त्याची इच्छा होती की मी इटलीला शिफ्ट व्हाव. घर आणि देश सोडून सगळं. इतकंच नाही तर जेव्हा मी आजारी होते आणि प्रवास करु शकत नव्हते, तेव्हा तो बोलायचा की मला भेटायला ये. मी अशा टर्म्स आणि कंडिशन्स नात्यात फॉलो करु शकत नाही, त्यामुळे मी विचार केला की त्यापेक्षा चांगलं हे असेल की आम्ही विभक्त होऊ.'
पुढे ब्रेकअपनंतर काय झालं याविषयी सांगत पौलमी म्हणाली, 'मला खूप जास्त स्ट्रेस होतं आणि खूप वजन देखील वाढलं होतं. त्याचं कारण म्हणजे स्ट्रेसमध्ये असताना मी खूप खाऊ लागली होती. यातून बाहेर पडण्यासाठी मला 5-6 महिन्यांचा वेळ लागला. या दरम्यान, माझे मित्र, कुटुंबांतून लोकांनी मला सांभाळलं. आता जर मी मागे वळून पाहते तर मला एका गोष्टीची जाणीव होते की मी चूक केली. पण या चुकांमधून मी खूप काही शिकले आहे.'
हेही वाचा : 'हा काळ...', ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजविषयी सांगितल्यानंतर पोस्ट शेअर करत हिना खान भावूक
पौलमी पुढे बोलते की ब्रे'कअपच्या आधी मी माझ्या नात्यावर काम करत होते आणि इटलीत त्याच्यासोबत वेळ व्यथीत करायचे. ब्रेकअपनंतर मी माझा संपूर्ण वेळ स्वत: ला दिला. थोडा वेळ लागला, पण मी पुन्हा बाऊंस बॅक केलं आणि आता मी ठीक आहे.'