Adipurush Trailer : 'आदिपुरुष'चा ट्रेलर रिलीज, रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खान पाहिलात का?

Adipurush Trailer Released : बाहुबली या चित्रपटामध्ये संपूर्ण भारताचा स्टार बनलेला साऊथचा सुपरस्टार प्रभास त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रभास आणि क्रितीची जी चर्चा आहे तीच चर्चा हनुमानाच्या भूमिकेत साकारलेल्या देवदत्त नागेचीही आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 9, 2023, 04:20 PM IST
Adipurush Trailer : 'आदिपुरुष'चा ट्रेलर रिलीज, रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खान पाहिलात का? title=
Adipurush Official Trailer Released

Adipurush Official Trailer Released : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' (Adipurush Trailer ) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी, सीतामातेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे यांची झलक पाहयला मिळाली. मुंबईतील पीव्हीआर जुहू येथे चित्रपटाचा एक भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथे चाहत्यांच्या उपस्थितीत ट्रेलर डिजिटल पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यावेळी व्हीएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवर बरीच टीका केली. या टीकेनंतर निर्मात्यांनी ट्रेलरमध्ये, दृश्यांमध्ये बरेच बदल केले आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर #Adipurush ट्रेंड होत आहे. 

आदिपुरुष (Adipurush Movie) हा चित्रपट रामायणावर आधारित असून या ट्रेलरमध्ये श्री राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला गेले दिसत आहेत. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खात आहेत. तर हनुमानाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे लक्ष्मणाला बरे करण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणत आहे. यानंतर राम आणि लक्ष्मण वानरांसह रामसेतूहून श्रीलंकेला जाताना दिसतात. इतकंच नाही तर हनुमान जी अंगठी घेऊन सीता मातेकडे जातो, त्याची झलक ही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खानची एक छोटीशी झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.  

वाचा : रावणाच्या लूकमध्ये मोठा बदल...,आदिपुरुषचा ट्रेलर लीक, पाहा Video

चित्रपट प्रदर्शित केव्हा होणार?

या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनने माता आई सीतेची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 2D, 3D, IMAX सारख्या फॉरमॅटमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 16 जून रोजी जगभरातील 20 हजार पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 

आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट?

प्रभासच्या या चित्रपटाची घोषणा 2020 मध्ये अधिकृत मोशन पोस्टरद्वारे करण्यात आली होती. या चित्रपटातील संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. चित्रपटाचे बजेट 700 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे.