का आली ऐश्वर्या रायला सलमान खानची आठवण? पाहा Video

बच्चन कुटूंबाच्या सुनेच्या तोंडी सलमान खानचं नाव, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

Updated: Jul 20, 2022, 03:56 PM IST
का आली ऐश्वर्या रायला सलमान खानची आठवण? पाहा Video

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या फक्त तिच्या सुंदरतेसाठी नाही तर अभिनयासाठी देखील ओळखली जाते. करिअरच्या सुरुवातीपासून ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि ऐश्वर्याच्या रिलेशनशिपबद्दल तर सगळ्यांनाच माहित आहे. ऐश्वर्याने एका मुलाखतीत सलमानचं नाव घेतलं होतं. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत ऐश्वर्या तिच्या चित्रपटातील स्टार कास्टविषयी बोलताना दिसते. त्यावेळीच ती सलमानचं देखील नाव घेते. ऐश्वर्याने सलमानचं नाव घेणं नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं आहे. तर तिचा मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 या मुलाखतीत ऐश्वर्याला आणि शाहरुखची जोडी 'मोहब्बतें' चित्रपटात फार कमी वेळासाठी दिसली होती, पण चाहत्यांना ही जोडी प्रचंड आवडली, तर देवदास या चित्रपटात देखील ते दोघं स्क्रिनवर कमी वेळ दिसले आणि 'जोश' चित्रपटात शाहरुखच्या बहिणीच्या भूमिकेत ऐश्वर्या दिसली होती, यावर तिला विचारण्यात आलं की तिला याचं दु: ख आहे का? तर ऐश्वर्या म्हणाली, 'नाही, असं अजिबात नाही. मला मन्सूरसोबत काम करायचं होतं आणि सुरुवातीला आमिर आणि सलमान हे कलाकार चित्रपटात असतील असं सांगितलं आणि नंतर शाहरुखला या चित्रपटात घेतलं.

ऐश्वर्या आणि सलमान यांची जोडी बॉलिवूडच्या सगळ्यात चर्चेत राहिलेल्या जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि नंतर त्यांचा ब्रेकअप झालं. ऐश्वर्याने नंतर अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि त्या दोघांना एक मुलगी असून आराघ्या असे तिचं नाव आहे.