आकांक्षा पुरी 'या' गायकासोबत अशा अवस्थेत दिसली; फोटो पाहून मिका सिंगचा होऊ शकतो हार्टब्रेक

 'मीका दी वोहटी'स्वयंवर जिंकल्यानंतर आकांशा पुरी हिच्या डोक्यातून बोल्डनेस उतरण्याचे नाव घेत नाही आहे.

Updated: Oct 11, 2022, 12:04 AM IST
आकांक्षा पुरी  'या' गायकासोबत अशा अवस्थेत दिसली; फोटो पाहून मिका सिंगचा होऊ शकतो हार्टब्रेक title=

मुंबई : 'मीका दी वोहटी'स्वयंवर जिंकल्यानंतर आकांशा पुरी हिच्या डोक्यातून बोल्डनेस उतरण्याचे नाव घेत नाही आहे. आकांक्षा सतत बोल्ड आणि हॉट ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर येत असते. त्याच बरोबर, अभिनेत्री मिका सिंग व्यतिरिक्त इतर कोणासोबत तरी बोल्ड फोटोसाठी पोज देताना दिसली. विशेष बाब म्हणजे अभिनेत्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आकांक्षा एका व्यक्तीसोबत इतकी क्लोज दिसत होती की, फोटो पाहून मिका सिंगलाही राग येऊ शकतो.

सुखदीपसोबत दिसली
या फोटोंमध्ये आकांशा पुरी ज्या व्यक्तीसोबत दिसत आहे तो प्रसिद्ध गायिका असून त्याचं पूर्ण नाव सुखदीप सिंह आहे. मात्र त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर सुखाई म्युझिकल असं लिहिलं आहे. या फोटोंमध्ये आकांक्षा पुरी गायिकेसोबत मर्यादेपेक्षा जास्त दिसत आहे.

लिहिलं हे कॅप्शन 
हा सुंदर फोटो आकांशा पुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'वाइब है वाइब है'. आकांक्षाने हे फोटो शेअर करताच, ती चर्चेत आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वयंवर जिंकल्यानंतर आकांशा पुरी मिका सिंगला डेट करत आहे. अभिनेत्री मिका सिंगसोबत दररोज स्पॉट होते. इतकंच नाही तर ती एकापेक्षा एक बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असेते. जे पाहून चाहते हैराण झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री अधिक खुलवणारे कपडे घालून कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसली. मिका सिंगच्या आधी आकांक्षा 'बिग बॉस सीझन 13' मधील माजी स्पर्धक पारस छाब्राला डेट करत होती.