मुंबई : बॉलिवूडमधील सुपरस्टार अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. मग कधी त्याच्या सिनेमांमुळे तर कधी त्याच्या वक्तव्यांमुळे. आता अक्षय कुमार चर्चेत आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिलेल्या सल्लामुळे.
अक्षय कुमार अजेंडा आज तक 2019 मध्ये सहभागी झाला होता. यावेळी अक्षयने अमित शहांना सल्ला आणि टीप्स एकत्र दिली आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुत्रसंचलन करणाऱ्या व्यक्तीने अक्षयला अमित शहांना काही प्रश्न विचारणार का? असा सवाल केला.
तेव्हा खूप विचार करून अक्षय म्हणाला की, प्रश्न नाही पण एक सल्ला देऊ इच्छितो. 'अमित शहांना सांगू इच्छितो की, त्यांनी सायंकाळी 6.30 नंतर काही खाऊ नये. कारण आपल्या शास्त्रांनुसार सूर्यास्तानंतर काही खाऊ नये. यामध्ये काही चुकीचं नाही तर यामुळे आपणच फिट राहतो', असा सल्ला अक्षयने दिला आहे. तसेच पुढे अक्षय म्हणाला की,' ते देशातील महत्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी'.
अक्षय कुमारने या चर्चेत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. एकेकाळी आपले 14 सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यानंतर त्याने कॅनडामध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी अक्षयचा मित्र राहत असे. तेथे जाऊन अक्षयने कॅनडाचा पासपोर्ट देखील काढला. मात्र भारतात त्याचा 15 वा सिनेमा हिट ठरला आणि त्याने जाण्याचा निर्णय रद्द केला. गेले अनेक वर्ष आपण इथे काम करतोय तेव्हा आपण इथलं नागरिकत्व स्वीकारावं याकडे लक्षच गेलं नाही. पण आता त्यावर चर्चा होत असल्याचं अक्षय म्हणाला.