Akshay Kumar molested: अक्षय कुमार (Akshay Kumar) याला बॉलिवूडचा खिलाडी म्हणून देखील ओळखलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट (Akshay Kumar Movie) फ्लॉप जाताना दिसत आहेत. असं असलं तरी, गेल्या अनेक वर्षापासून अक्षय सामाजिक विषयांना वाचा फोडणारे सिनेमा करत असल्याचं दिसतंय. त्यावरून वाद देखील सुरू आहेत. मात्र, काहींनी त्याचं कौतूक देखील केलंय. अशातच आता अक्षयचा सेल्फी सिनेमा (selfie cinema) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Akshay Kumar shared shocking story of man molested him in elevator when he was 6 year old latest news)
लहान असताना मी शेजाऱ्यांकडे जात असायचो. त्यावेळी मी फक्त 6 वर्षाचा होतो. एकदा लिफ्टमधून जात असताना एका माणसाने माझ्या पार्श्वभागाला (Private Part) हात लावला. तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं, त्यानंतर मी ही गोष्ट तात्काळ माझ्या आई-वडिलांना सांगितली. पोलिसांनी तक्रार (Police complaint) दाखल करून घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक (Arrest) देखील केली. याचा मला धक्का बसला नाही, तर त्याचा फायदा मला झाला, असं अक्षय कुमार (Akshay Kumar On Molestion) म्हणाला.
मी तसा लाजाळू होतो, पण मी माझ्या आई-वडिलांजवळ माझं मन मोकळं करू शकत होतो, असा अनुभव देखील अक्षयने शेअर (Akshay Kumar shared shocking story) केलाय. आई-वडिलांनी महिला आणि मुलांनी याबद्दल उघडपणे बोललं पाहिजे, असंही अक्षयने स्पष्टपणे म्हटलं आहे.
आणखी वाचा - जेव्हा Akshay Kumar च्या दोन EX समोरा-समोर येतात तेव्हा...
दरम्यान, अक्षय कुमार हा एका चित्रपटासाठी (Akshay Kumar Movies) तब्बल 50 ते 100 कोटी फी घेतो. माझे चित्रपट फ्लॉप जाण्याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून, त्याला मीच कारणीभूत आहे, असं अक्षय म्हणतो. मात्र, त्याच्या चित्रपटांचा परिणाम सामाजिक आयुष्यावर होताना दिसतोय. त्यामुळे अनेकदा विविध कार्यक्रमात त्याचं कौतूक देखील होताना दिसतं.