मुंबई : एप्रिलमध्ये विवाहबद्ध झालेलं स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच पालक होणार आहेत. आधी रणबीर शमशेरा आणि आता ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करताना दिसत आहे. तर आलिया तिच्या पहिल्या प्रोडक्शन डार्लिंग्स आणि ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करत आहे. रणबीर आलियाने अलीकडेच प्रेग्नेंसीनंतर तिचा पहिला पब्लिक अपिअरन्स दिला. ज्यामध्ये आलियाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. आता आलियाची डिलिव्हरी कधी होणार हे सुत्रांकडून कळत आहे.
आलियाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे
आलिया भट्ट अलीकडेच पती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या नवीन गाण्याच्या प्रीव्ह्यूसाठी दिसली होती. प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर आलिया आणि रणबीरची ही पहिलीच सार्वजनिक उपस्थिती होती. आलियाने ऑरेंज कलरचा टाइट ड्रेस घातला होता ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता.
आलियाच्या ड्यू डेटचा झाला खुलासा
आलिया रणबीरने त्यांच्या मीडिया संवादांमध्ये याबद्दल काहीही सांगितलं नाही. परंतु बॉलिवूड लाईफच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितलं की आलिया सध्या चार महिन्यांची गर्भवती आहे. आलियाची डिलिव्हरी कधी होणार हेही या सूत्राने सांगितलं. सूत्राने सांगितलं आहे की, आलिया खूप उत्साहित आहे आणि ती स्वतःची विशेष काळजी घेत आहे. ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनदरम्यान आलिया आणि रणबीर एकत्र वेळ घालवणार आहेत.
सूत्रानुसार, आलिया आणि रणबीर या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करतील. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर आलियाची प्रसूती अवघ्या चार महिन्यांवर आहे. आलिया भट्ट डिसेंबर 2022 मध्ये तिच्या बाळाला जन्म देऊ शकते. संपूर्ण कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंब या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आ