Alia Bhatt Second Child: आलिया-रणबीर म्हणतायत 'हम दो हमारे दो', असं आहे फॅमिली प्लॅनिंग?

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor ला पाहिजे आणखी एक बाळ? या लोकप्रिय जोडप्याची फॅमिली प्लॅनिंगची माहिती आली समोर...

Updated: Jan 23, 2023, 05:57 PM IST
Alia Bhatt Second Child: आलिया-रणबीर म्हणतायत 'हम दो हमारे दो', असं आहे फॅमिली प्लॅनिंग?  title=

Alia Bhatt Second Child: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे एप्रिल 2022 रोजी लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या 2 महिन्यानंतर आलियानं ती प्रेग्नंट (Alia Bhatt Pregnancy) असल्याची बातमी दिली आणि नोव्हेंबर 2022 रोजी तिनं त्यांची मुलगी राहाला (Raha) जन्म दिला. राहाचा चेहरा पाहण्यासाठी आलिया आणि रणबीरचे चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे आलिया आणि रणबीरनं 2 वर्षांनंतर राहाचा चेहरा दाखवणार असल्याचे म्हटले आहे. आलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. आलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. दरम्यान, या सगळ्यात आलिया आणि रणबीरची फॅमिली प्लॅनिंग आणि दुसऱ्या मुलाविषयी ते दोघे काय विचार करतात ते समोर आलेलं आहे. 

आलिया दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या या फक्त अफवा आहेत. तर आता आलियाची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही एक जुनी मुलाखत असून या मुलाखतीत आलिया सांगते की, तिला दोन मुले हवी आहेत आणि तिला आशा आहे की तिच्या कुटुंबात दोन मुले असतील. आलियाला जरी दोन मुले होतील अशी अपेक्षा असली तर तिला पहिली मुलगी आहे. तर तिचा दुसरा मुलगा असेल असे तिला वाटते. रणबीरलाही लहान मुलं खूप आवडतात, तर पुढे जाऊन आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा आई-वडील होतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. 

हेही वाचा : भीषण अपघातानंतर 'Avenger' फेम अभिनेत्याची अवस्था वाईट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियानं दोन फूलं हातात धरली असून तिच्या चेहऱ्यासमोर दिसत आहेत. ही दोन फूलं काही तरी महत्त्वाचे दर्शवत आहेत. इतकंच काय तर आलियानं फोटोला कॅप्शन देत 2.0 Stay Tuned असे कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट असून राहासाठी लहान भाऊ किंवा बहीण येणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.

राहाला पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागेल इतक्या वर्षांची प्रतिक्षा

'आम्हाला राहाचा चेहरा दाखवयचा नाही असं काही नाही. पण सध्या ती लहान आहे. अशात किमान दो वर्षे तरी तिला या जगापासून दूर राहू द्या. दोन वर्षानंतर आम्हीच तिला तुमच्यासमोर आणू. आई वडील म्हणून सध्या आम्हाला तिची काळजी आहे', असं देखील आलिया आणि रणबीरनं सांगितलं. दुसरीकडे या मीटिंगमध्ये सर्व पापाराझींना राहा कपूरचा फोटो दाखवला. पण त्यानंतर फोटो काढण्यास सक्त मनाई केली.