Ameesha Patel Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या तिच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. अमीषा पटेलला लोकप्रियता ही 'कहो ना.. प्यार है' आणि 'गदर' या चित्रपटांमुळे मिळाली. प्रेक्षकांना अमीषा ही तिच्या फॅशनमुळे नाही तर तिच्या या काही चित्रपटांमुळे ओळखतात. अमीषानं तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले असले तरी तिचे सगळेच चित्रपट हे यशस्वी ठरले नाहीत. एका मुलाखतीत अमीषानं तिच्या आणि अभिनेता सलमान खानच्या 'ये है जलवा' या चित्रपटाच्या अपयशासाठी अभिनेत्याला जबाबदार ठरवलं आहे.
अमीषा 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. तर त्यानंतर लगेच 2002 मध्ये सलमान खानसोबत तिचा 'ये है जलवा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. त्यावर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमीषा पटेलनं यासाठी सलमान खान जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. अमीषानं ही मुलाखत 'बॉलिवूड हंगामा' ला दिली होती. सलमान खानच्या हिट-अॅँड रन या प्रकरणामुळे त्यांचा चित्रपट हिट झाला नाही. चित्रपटाकडे कोणी लक्ष दिलं नाही.
याविषयी बोलताना अमीषा म्हणाली, ''ये है जलवा' हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्या सगळ्यात चांगल्या चित्रपटांपैकी एक होता. सलमान खान कधीच इतका हॅंडसम दिसला नव्हता आणि त्यातील गाणी वगैरे सगळं चांगलं होतं. पण मला असं वाटतं की मीडिया पटपट द्यायचे, त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराविषयी निगेटिव्ह काही जाणून घेण्यासाठी तयार नव्हते. सलमानसोबत ही घटना नुकतीच झाली होती. सलमानबाबतची ही बातमी नुकतीच समोर आली होती त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिलाच नाही. जर प्रेक्षकांना त्यावेळी थोडी कल्पना असती... तर हा एक असा चित्रपट असता ज्यानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असती.'
हेही वाचा : 56 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सनी देओलची एकूण संपत्ती किती माहितीये का?
सलमान आणि अमीषाच्या या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर 3 जुलै 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर 28 सप्टेंबर 2002 रोजी भरदाव गाडी चालवण्याच्या प्रकरणी सलमानला अटक करण्यात आली होती. या घटनेत त्यानं मुंबईतील एका बेकरीला धडक दिली होती यावेळी फुटपाथवर झोपलेल्या लोकांवरून सलमाननं गाडी नेली होती. तर त्यावेळी एका व्यक्तीचे निधन झाले होते तर तीन लोकांना गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला सलमानवर हत्येचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर असलेले हे आरोप काढून टाकण्यात आले.