देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : मनसे चित्रपट कामगार सेना नेहमीच आपल्या कामामुळे सिनेसृष्टीत चर्चेत असते. एका मुलीला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ जणांना मनसेने मदत केली आहे. लखनऊहून हत्यारांसह आलेल्या ३ जणांना मनसेने आपल्या स्टाईलने सरळ केलंय, मनसे चित्रपट कामगार सेनेने या महिलेला कशी मदत केली, हे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितलं आहे.
व्हिडिओ शेअर करत माहिती
या व्हिडिओमध्ये अमेय खोपकर म्हणाले की, (अमेय खोपकर यांच्या शब्दात) ''आज सकाळी आमच्या मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष श्री पद्मनाभ राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला. तिला एका काल कास्टिंग डिरेक्टरने कॉल केला होता. तुला एका हिंदी सिनेमामध्ये कास्ट केलेलं आहे. पण जर का तुला लीडरोल हवा असेल तर उद्या ते प्रोड्युसर लखनऊवरुन मुंबईत येणार आहेत.
मात्र तुला त्यांच्यासोबत जाऊन त्यांना खूश करावं लागेल. तुला कॉमप्रोमाईज करावं लागेल. तरच तुला त्या मोठ्या फिल्ममध्ये रोल मिळेल. त्या मुलीने हिंमत दाखवली घरच्यांच्या कानावर घातलं. तिच्या घरच्यांनी मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातलं. त्यांनी लगेच मला फोन केला. मला म्हणाले, ताबडतोब त्यांना फोन करा आणि पकडा. आणि त्यांना पोलिसांच्या अहवाली करा.
ठाणे घोडबंदर रोड येथे एक फार्महाऊस आहे. आज या चारही नराधमांबरोबर ती मुलगी तिथे गेली. आपले सहकारी त्यांच्या मार्गावर होतेच. त्या मुलीने हिंम्मत दाखवली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. आणि त्य़ांच्याकडून आता असं कळलंय की, त्यांच्याकडे कट्टे सापडलेत. त्यांची नावं आहेत गिरीजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव, ही सगळी लखनऊची माणसं आहेत.