मुंबई : बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन लवकरच छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' या शोमधून बिग बी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दाखल होणार आहेत. बिग बींच्या या शोबाबत अनेकांना मोठी उत्सुकता असते. आता 'कौन बनेगा करोडपती'च्या शोसाठी रजिस्ट्रेशनची तारिख आणि प्रदर्शनाची तारिखही समोर आली आहे. 'कौन बनेगा करोडपती'साठी बिग बींनी शूटींग सुरु केलं आहे.
'कौन बनेगा करोडपती' येत्या ऑगस्ट महिन्यापासून टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शो प्राइम टाईम ९ वाजण्याच्या सुमारास टिव्हिवर दाखवण्यात येणार आहे. 'कौन बनेगा करोडपती' या एक तासाच्या शोमुळे ९.३० वाजताची 'लेडीज स्पेशल' ही मालिका ऑफ एयर होण्याची शक्यता आहे. तसंच ९ वाजताच्या 'पटियाला बेब्स' शोची वेळही बदलण्यात येणार आहे.
T 3089 - आदर आदाब अभिनंदन आभार ! मैं अमिताभ बच्चन प्रस्तुत करने जा रहा हूँ , इस वर्ष २०१९ का नया अभियान ... कौन बनेगा करोड़पति ... KBC !!
बहुत जल्द आपके घरों में !! pic.twitter.com/mzeLj36Wfh— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 13, 2019
'केबीसी'चं रजिस्ट्रेशन १ मे पासून सुरु होणार आहे. रात्री ९ ते १० चालणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती'चं सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करणार आहेत. २००० साली 'कौन बनेगा करोडपती' पहिल्यांदा सुरु करण्यात आलं होतं. २००० साली सुरु झालेल्या 'केबीसी'ला यंदा १९ वर्ष पूर्ण होणर आहेत.