मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर सध्या त्याच्या आगामी सिनेमा 'अॅनिमल' सिनेमामुळे सतत चर्चेत आहे. 'अॅनिमल' 'अॅनिमल' हा मोस्ट वेटेड सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. बॉबी आणि रणबीरशिवाय या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची एडवांन्स बुकिंग एक आठवड्यापासूनच सुरु झाली आहे. हा सिनेमा रिलीज होण्यासाठी तिन दिवस बाकी आहेत. मात्र सिनेमा रिलीज होण्याआधीच या सिनेमाने जवळ-जवळ 10 करोड रुपयांच कलेक्शन केलं आहे.
या सिनेमाची गेले अनेक दिवस प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र हा सिनेमा रिलीज होण्याआधीच या सिनेमाने छप्पर फाड कमाई करायला सुरुवात केली आहे. १ डिसेंबरला रिलीज होणारा हा सिनेमा चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं एडवान्स बुकिंग सुरु झालं आहे. ज्याची तिकीट्स २२० ते २२०० पर्यंत आहे. तिन दिवसांपुर्वीच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपलं खातं सुरु केलं आहे.
'सैकनिक'च्या रिपोर्टनुसार एडवान्स बुकिंगमधूनच एनिमल 10 करोड कमावण्याच्या मार्गावर आहे. या आकड्यापर्यंत पोहचण्यासाठी काहीच पाऊलं हा सिनेमा मागे आहे. रिपोर्टनुसार या सिनेमाच्या हिंदी वर्जनेच ८ करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर तेलुगू, तामिळ, कन्नड सिनेमाचं कलेक्शन पकडून या सिनेमाने आत्तापर्यंत 9.75 करोड इतकी कमाई केली आहे. हा सिनेमा शाहरुखच्या पठाण आणि जवानलाही मागे टाकण्याच्या वाटेवर आहे.
रिपोर्टनुसार , 'एनिमल' 2779 स्क्रीन्ससाठी PVR, INOX an Cinepolis मध्ये आत्तापर्यंत 5 करोड कमाई केली आहे. एडवान्स बुकिंग रिलीज होण्याआधीच विकेंडपासून सुरु केलं आहे. त्यामुळे चाहते आधीपासूनच या सिनेमाचं बुकिंग आपल्या सोयीनुसार करत आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसत आहे. हा सिनेमा रिलीज होण्यासाठी तीन दिवस बाकी आहेत. तीन दिवसात या सिनेमाच्या कलेक्शनचा आकडा अजून वाढू शकतो असंही म्हटलं जातंय. आत्तापर्यंत या सिनेमाचे 128k तिकीटांची विक्री झाली आहे आणि याची विक्री अजूनही सुरु आहे.
एनिमल या सिनेमाला A सर्टिफिकेट मिळालं आहे. ट्रेड एक्सपर्ट्स याचं मानणं आहे की, रणबीरचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ओपनिंगच्याच दिवशी तुफान कमाई करेल. एवढंच नव्हेतर या वर्षीच्या सगळ्यात जास्त ओपनिंग करणारा सिनेमाम्हणून ओपनिंग करुन रेकॉर्ड बनवेल असं म्हटलं जात आहे. याच सिनेमासोबत विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा सिनेमादेखील रिलीज होणार आहे. या दोन्ही सिनेमात चांगलीच टक्कर होऊ शकते. त्यामुळे कोणता सिनेमा बाजी मारतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.