मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा तिच्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने लवकरचं विवाह बंधनात अडकणार असल्याची हिंट दिली आहे. अंकिताने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लग्नापुर्वी मिळालेल्या गिफ्टचा फोटो चाहत्यांसोबत पोस्ट केला आहे.
अंकिताने सोशल मीडियावर मिळालेल्या तीन जोडी चप्पलांचे फोटो शेअर केले आहे. महत्त्वाचं म्हणजे, त्यावर 'Bride to be' असं लिहिलं आहे. त्यामुळे अंकिता लवकरचं लग्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अंकिताला ही भेटवस्तू एका शू स्टोरमधून मिळाली आहे. अंकिताने त्यांचे आभार मानले आहेत. शू बॉक्सवर देखील 'Happy Bride' असं लिहिलं आहे.
यापूर्वी ई-टाइम्सने अंकिता आणि विकी जैन यांच्या लग्नाची माहिती शेअर केली होती. रिपोर्टनुसार, अंकिता आणि विकी डिसेंबरमध्ये सात फेरे घेणार आहेत. 12, 13 आणि 14 डिसेंबरला हे जोडपे लग्न करणार असल्याचीही बातमी आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अंकिता लवकरच तिच्या लग्नाचे आमंत्रण देईल अशी अपेक्षा आहे.
विकी जैनला डेट करण्याआधी अंकिता लोखंडे दिवंगत स्टार सुशांत सिंह राजपूतसोबत दीर्घकालीन संबंधात होती. दोघेही जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघं पवित्र रिश्ताच्या सेटवर भेटले आणि प्रकरण अगदी लग्नापर्यंत पोहोचलं पण 2016 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचं निधन झालं.