Which Direction Should One Face While Sleeping : स्पर्धा आणि धावपळीच्या जगात इथे प्रत्येकाला शांत आणि पुरेश जोप मिळत नाही. झोप ही आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. योग्य वेळ, योग्य जागा आणि डोळ्यावर झोप असली तरी झोपण्यासाठी गेल्यावर शांत झोप लागत नाही. यामागे वास्तूशास्त्रानुसार तुमची झोपण्याची दिशा कारणीभूत असू शकते असं सांगण्यात येतं. वास्तूशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा धन आणि समृद्धीच्या दृष्टीकोनातून खूप चांगली मानली जाते. मात्र झोपण्याच्या दृष्टीकोनातून ती सर्वोत्तम मानली जात नाही. उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागतं. या दिशेला झोपणे का वर्ज्य आहे हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून समजून घेऊया.
उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने पाय आपोआप दक्षिणेकडे टेकतात. दक्षिण दिशेला यमाची दिशा किंवा मृत्यूचे द्वार असेही म्हटलं जातं. यमाचा पाय या दिशेला असण्याचा प्रतिकात्मक अर्थ असा आहे की आपण दक्षिण दिशेच्या म्हणजेच नकारात्मक उर्जेच्या प्रभावाखाली आहोत, त्यामुळे जीवनशक्ती कमी होते.
उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने झोप येत नाही आणि जरी झोप लागली तरी ती शांत नसते. तुम्हाला सारखी जाग येते. एकदा झोप गेली की ती पुन्हा येत नाही, माणूस वळवळत राहतो. झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्ती निद्रानाशाचा शिकार बनतं आणि मग त्याच्यावर सर्व प्रकारचे आजार होण्याची भीती असते.
या दिशेला डोके ठेवून झोपल्यास नकारात्मक विचार आणि दुःस्वप्न येऊ लागतात, ज्यामुळे व्यक्तीला कधी-कधी अस्वस्थ वाटू लागते.
जे लोक झोपण्यासाठी उत्तर दिशा निवडतात किंवा ज्यांची बेडरूम उत्तरेकडे असते. अशा लोकांचे हृदय सहसा कमकुवत असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घाबरणे ही त्यांची सवय बनते. माणसाला हृदयविकार होण्याची भीती असते आणि जे हृदयरोगी आहेत त्यांना हृदयविकाराची भीती होण्याची भीती असते.
जे लोक उत्तरेकडे डोके ठेवून झोपतात त्यांना डोके जड वाटतं आणि डोकेदुखीचीही तक्रार असते. रात्री छातीवर किंवा मानेवर कोणीतरी ओझं ठेवल्यासारखं वाटतं.
उत्तरेकडे डोके ठेवून झोपणाऱ्यांसोबत काही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी झोपताना डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे ठेवा. दुसरा पर्याय म्हणून, झोपताना डोके पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवता येते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती साधारण गोष्टींवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)