Eknath Shinde : आज बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील बीकेसीत शिवसेनेनं शिवोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिंदे म्हणाले की, स्वबळावर निवडणूक लढवणार. पण स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. निवडणुकीत लढून जिंकण्यासाठी या भुज्यांमध्ये ताकद लागते. आणि घरात बसून लढता येत नाही. तु लढो हम कपडा समालते हैं, असं बोलून निवडणूक जिंकता येत नाही. तसंच कार्यकर्त्यांची मनंही जिंकता येत नाहीत. त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. त्यांच्या सुख दु:खात समरस व्हावं लागतं, या शब्दात त्यांनी उद्घव ठाकरेंवर टीका केली.
शिंदे पुढे म्हणाले की, म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जंयती आहे, त्यांना फक्त शिवसेना प्रमुखांची जंयती एवढंच आठवते. मात्र स्मारकात गेल्यावर ज्या लोकांनी बाळासाहेबांची विचार सोडले त्यांना बोलवणार नाही. खरं म्हणजे जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक आहेत, ते काय बांधणार स्मारक? अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला हे बोलण्याच नैतिक अधिकार नाही. कारण बाळासाहेबांचे विचार 2019 लाच सोडण्याच पाप तुम्ही केलं. म्हणून मी सांगतो त्यादिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकावर जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागावी.
बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मुंबईतील बीकेसीत शिवसेनेनं शिवोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलंय. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्रम स्थळी आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदारांचा जाहीर सत्कार होणार आहे. सत्कार समारंभानंतर एकनाथ शिंदे सभेला संबोधित करतील.