सैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले 'माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो...'

Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे (Mohammad Shariful Islam Shehzad) वडील रुहुल अमीन (Ruhul Ameen) यांनी मोठा दावा केला आहे. सैफच्या घरी सीसीटीव्हीत दिसणारा तरुण माझा मुलगा नाही असा दावा त्यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 23, 2025, 09:23 PM IST
सैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले 'माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो...' title=

Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे (Mohammad Shariful Islam Shehzad) वडील रुहुल अमीन (Ruhul Ameen) यांनी मोठा दावा केला आहे. सैफ वास्तव्यास असणाऱ्या इमारतीच्या सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आपला मुलगा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या वडिलांनी सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि आपल्या मुलात काहीच समानत नसल्याचं म्हटलं आहे. 

आरोपी शरीफुल इस्लामच्या वडिलांनी म्हटलं आहे की, "सैफ अली खानच्या घरी मिळालेल्या सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती माझा मुलगा नाही. त्या व्यक्तीचे केस मोठे आहेत. माझा मुलगा लष्करातील जवानांप्रमाणे छोटे केस ठेवतो". शरीफुलने आपली माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी तो बाईक-रिक्षा चालवत असे. 

सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर शरीफुल बांगलादेशला पळून का गेला नाही? खरं कारण आलं समोर, 'जास्त पैसे...'

 

रुहूल अमीनने 2007 पर्यंत बांगलादेशमधील खुलना येथे एका जूट मिलमध्ये काम केलं. यानंतर ते आपल्या गावी परतून शेती करु लागले. हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचला त्याचं बांगलादेशी ओळखपत्र आणि वाहतूक परवाना मिळाला आहे. त्यावर त्याचं नाव शरीफुल इस्लाम लिहिलं आहे. 

पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रांमधून त्याच्या वडिलांचं नाव  मोहम्मद रुहूल अमीन असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या रविवारी शरीफुलला ठाण्यातून अटक करण्यात आली. आपलं नाव विजय दास असं बदलून तो बेकायदेशीरपणे मुंबईत राहत होता. तो बांगलादेशच्या बरिशाल येथील रहिवासी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो मुंबईत होता. 

'मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....'

 

हल्ल्यानंतर शरीफुल पश्चिम बंगालमधील हावडा येथे पळून जाण्याच्या तयारीत होती. यानंतर तेथून तो बांगलादेश गाठणार होता. पण पोलीस आपल्या शोधात असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याची योजना सत्यात उतरु शकली नाही. त्याने घाईत हावडाला जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. पण इतक्या लवकर तिकीट हवी असल्याने ट्रॅव्हल एंजट जास्त पैशांची मागणी करत होते. 

रक्तबंबाळ अवस्थेतील सैफ अली खानला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला किती बक्षीस मिळालं माहितीये?

शरीफुल तिकीट मिळवण्याच्या आधीच मुंबई पोलिसांनी ठाण्यात त्याला गाठलं आणि अटक केली. दरम्यान मुंबई पोलीस शरीफुल ज्या ट्रॅव्हल एजंट्सच्या संपर्कात होता त्या सर्वांची माहिती घेत आहेत. हाय प्रोफाईल प्रकरण असल्याने पोलीस या सर्व एजंट्सची चौकशी करणार आहेत.