Ankita Lokhande pregnancy test : छोट्या पडद्यावर 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आहे. सध्या अंकिता लोखंडे ही 'बिग बॉस 17' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिताला ठीक वाटत नाही आहे. तिला संशय आहे की ती प्रेग्नंट आहे आणि त्यामुळेच तिला ठीक वाटत नसेल. 2 दिवस आधी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये त्यांनी सांगितलं होतं की तिला आंबट खायची इच्छा होते. त्यावर रिंकू धवननं तिला प्रेग्नंसीवरून चिडवायला सुरुवात केली. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अंकिता आणि विकी बोलताना दिसले आहेत. यात अंकिता त्याला बोलताना दिसते की तिची मासिक पाळी आलीच नाही. त्यानंतर अंकितानं विकीला हे देखील सांगितले की तिनं प्रेग्नंसी टेस्ट देखील केली आहे.
खरंतर अंकिता आणि विकी जेव्हा पासून 'बिग बॉस 17' मध्ये आले आहेत. तेव्हा पासून त्यांच्यात वाद आणि भांडण सुरु आहे. सततच्या या वादाला कंटाळलेली आणि दु:खी अंकिता ही शो सोडणार असं बोलताना दिसते. ती पुन्हा एकदा सांगितलं की तिला घरी जायचं आहे. अंकिता विकीला बोलताना दिसते की 'मला कसं तरी वाटतंय, मी आजारी आहे. मला आतून हे जाणवतय. मी ठीक नाही आहे. मला मासिक पाळी येत नाहीये , मला घरी जायचयं.'
अंकिताचं हे बोलणं ऐकताच विकी बोलतो की 'काही दिवसांपूर्वी तर तू सांगितलं होतं की फर्स्ट डे आहे.' त्यावर अंकिता म्हणाली की मासिकपाळी नाही, माझी बल्ड टेस्ट झाली आहे. प्रेग्नंसीसाठी, इथे आतमध्ये तर काही नाही आहे. त्यासोबत तिनं यूरिन टेस्ट झाल्याचे देखील सांगितले आणि रिपोर्ट्स अजून आल्या नाहीत.'
हेही वाचा : तुम्ही पनवती आहात? अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांची वर्ल्ड कप फायनल न पाहण्याची विनंती
दरम्यान, विकी या विषयाला सोडून दुसऱ्या विषयावर बोलताना दिसते. विकी आणि अंकिता शोमध्ये भांडताना दिसतात आणि त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसते. अनेक नेटकरी त्याला टॉक्सिक नवरा म्हणत ट्रोल करताना दिसतात. तर अंकिताला नेटकरी पजेसिव्ह बोलताना दिसतात. अंकिता आणि विकी हे पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 14 डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी लग्न केलं. या आधी अंकिता ही सुशांत सिंह राजपुतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.